शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:46 IST

गर्दीच्या ठिकाणी १२ तास घालणार गस्त, आलेल्या तक्रारी सोडवणार

मीरा रोड : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून मीरा- भार्इंदर महिलापोलिसांचे निर्भया पथक स्थापन झाले आहे. या पथकासाठी स्वतंत्र वाहन असून त्यात वाहनचालक, पोलीस अधिकारी व कर्मचारीही महिलाच आहेत.शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थीनींची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. यातून शारीरिक शोषणाचे गुन्हे घडतात. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी, प्रवासातही या विद्यार्थीनींना तरूणी व महिलांना छेडछाड, लगट आदी अनुभव येत असतात. नोकरी, कामाच्याठिकाणीही अशा प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागते. घरगुती वादातून महिलांवरील होणारे अत्याचारही वाढीस लागलेले आहेत.महिलांची सुरक्षितता व त्यांना तातडीने पोलीस मदत मिळावी म्हणून पोलिसांची निर्भया पथके स्थापन केली जात आहेत. मीरा- भार्इंदर शहरासाठीही निर्भया पथक तैनात केले असून मंगळवारी सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग, निरीक्षक सुरेश गेंगजे व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निर्भया पथक स्थापन करण्यात आले.या पथकासाठी स्वतंत्र वाहन दिलेले आहे. शहरातील शाळा, महाविद्याल, सार्वजनिक ठिकाणी हे पथक सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान गस्त घालणार आहे. या पथकासोबत दोन पुरुष पोलीस देण्याचा विचार सुरु आहे. पोलीस मुख्यालयातून या पथकासाठी महिला अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून त्या नंतर पथक २४ तास सक्रिय असेल असे कुलकर्णी म्हणाले.विद्यार्थीनी, तरुणी, महिलांच्या तक्रारी आल्यास तातडीने घटनास्थळी पोहचून मदत केली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीनींसाठी ठेवलेल्या तक्रार पेट्या व त्यातील तक्रारी हे पथक हाताळणार आहे.या पथकासाठी लवकरच हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. जेणेकरुन अडचणीच्यावेळी पोलिसांची तातडीची मदत मिळेल असे कुलकर्णी यांनी सांगितले.याद राखा छेड काढाल तर...मुली, महिलांची छेड काढाल तर याद राखा असा सज्जड दम देणारे फलकच नवघर पोलिसांनी तयार केले आहेत. छेड काढाल तर जेलमध्ये जाल. पण त्याचबरोबर नोकरी, सरकारी नोकरी व पासपोर्टही गमवाल. नवघर पोलिसांनी मुली, महिलांसाठी ७७७७००४५३५ हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे.

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिस