शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीतील दोन प्रभागांत आता होणार ‘सेरो’ सर्वेक्षण; केंद्र सरकारची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:59 IST

आरोग्य विभागाची तयारी सुरू, ५० लाख नागरिकांची प्रतिकारशक्ती ही कोरोनावर मात करणारी ठरली. त्याच धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतील हॉटस्पॉट असलेल्या क्रांतीनगर आणि आनंदवाडी येथे केंद्रीय आरोग्य पथकाने सेरोलॉजिकल सर्वेक्षणाची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मनपाने पाठविला होता.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट असलेल्या दोन प्रभागांमध्ये सेरोलॉजिकल सर्वेक्षण होणार आहे. त्यामुळे त्यातून किती टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे; तसेच ते कोणतेही उपचार न घेता बरे झाले आहेत, याची माहिती पुढे येऊ शकते.केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यामुळे मनपाने कोरोना रुग्ण शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी तापाचे दवाखाने, थर्मल स्कॅनिंग, घरोघरी जाऊन सर्वेक्षण अशा विविध उपाययोजना केल्या. सुरुवातीला मनपा हद्दीत कोरोनाचे १० हॉटस्पॉट होते. मात्र, हळूहळू ही संख्या ४७ पर्यंत पोहोचली. ही सगळी हॉटस्पॉटची ठिकाणे दाट लोकवस्ती व झोपडपट्टी विभागातील होती.

जुलैमध्ये कोरोना रुग्णांची एका दिवसातील संख्या ६३१ पर्यंत गेल्यानंतर मनपाने पुन्हा १७ दिवसांचा लॉकडाऊन घेत विविध उपाययोजना सुरू केल्या. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. मात्र अद्याप ही संख्या कमी होत नाही. विशेष म्हणजे, हॉटस्पॉट क्षेत्रातही आता नवीन रुग्ण आढळलेले नाहीत. मुंबई मनपाने केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणातून मुंबईतील ५० लाख नागरिकांना कोरोना होऊन गेला; तसेच त्यांनी त्यासाठी कोणतेही उपचार केले नसल्याचीही बाब पुढे आली.किती जणांना कोरोना झाला ते होईल स्पष्ट५० लाख नागरिकांची प्रतिकारशक्ती ही कोरोनावर मात करणारी ठरली. त्याच धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतील हॉटस्पॉट असलेल्या क्रांतीनगर आणि आनंदवाडी येथे केंद्रीय आरोग्य पथकाने सेरोलॉजिकल सर्वेक्षणाची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मनपाने पाठविला होता. त्याला केंद्राची मान्यता मिळाली आहे. आता या सर्वेक्षणाची तयारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. मनपाने प्रातिनिधिक स्वरूपात दोन प्रभाग निवडले आहेत. या दोन प्रभागांतील लोकसंख्येच्या आधारे मनपा हद्दीतील किती लोकांना कोरोना होऊन गेला आहे, याची माहिती पुढे येऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCentral Governmentकेंद्र सरकार