शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रंगमंचाचा ध्रुवतारा निखळला, ऱवी पटवर्धन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 06:13 IST

Ravi Patwardhan News : रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

ठाणे : रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात ते वास्तव्यास होते. शनिवारी रात्री त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री १०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मार्चमध्ये ही हृदयविकाराचा झटका आला होता. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. कला क्षेत्रासाठी स्वा. सावरकर प्रतिष्ठनाचा ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते सावरकर स्मृती पुरस्कार देण्यात आला होता. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील, अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळाल्या असल्या, तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.बालगंधर्व हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांचे असताना त्यांनी भूमिका केली होती. ‘आरण्यक’ हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये दिवंगत साहित्यिक रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि व८२व्या वर्षीही ते या नाटकात तिच धृतराष्ट्राची भूमिका करत होते. ते मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. नोकरीच्या कालावधीत बँकेतील त्यांचे सहकारी, अधिकारी व व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली. यशवंत पगार यांच्या ‘प्रपंच करावा नेटका’, १९७० मध्ये ‘मो.ग.रांगणेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हृदयस्वामिनी’ नाटकात त्यांनी काम केले, त्यावेळी नाटकात त्यांच्यासोबत शांता जोग होत्या. इंडियन नॅशनल थिएटरने वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेले ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले. त्यात त्यांना ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. दुभाषी त्यात ‘हेन्‍री’ करायचे. या पुढे त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या. पुढे त्यांनी विजया मेहता यांनी बसविलेल्या ‘मुद्राराक्षस’ या नाटकात ‘अमात्य राक्षस’, जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित ‘जबरदस्त’ या नाटकात ‘पोलीस अधिकारी’ या भूमिका केल्या; ‘विषवृक्षाची छाया’, ‘मला काही सांगायचंय’, ‘तुघलक’, ‘अपराध मीच केला’ आदी नाटके केली. १९६५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या ‘भाऊबंदकी’ नाटकात त्यांना काम मिळाले.

पटवर्धन यांच्यावर अंत्यसंस्कार ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर, दिग्दर्शक  किरण नाकती, अभिनेते सुनील गोडसे, विघ्नेश  जोशी, संजय बोरकर  आदी कलाकार अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत पटवर्धन यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.रवी पटवर्धन यांची नाटके/चित्रपट अपराध मीच केला, आनंद, आरण्यक, एकच प्याला, कथा कुणाची व्यथा कुणाला, कोंडी, कौंतेय, जबरदस्त, तुघलक, तुझे आहे तुजपाशी, तुफानाला घर हवंय, पूर्ण सत्य, प्रपंच करावा नेटका, प्रेमकहाणी, बेकेट, भाऊबंदकी,मला काही सांगायचंय, मुद्रा राक्षस, विकत घेतला न्याय,विषवृक्षाची छाया, वीज म्हणाली धरतीला,शापित, शिवपुत्र संभाजी, सहा रंगांचे धनुष्य, सुंदर मी होणार,स्वगत, हृदयस्वामिनीदूरचित्रवाणी कार्यक्रम/मालिकाआमची माती आमची माणसं, तेरा पन्‍ने, महाश्वेता, लाल गुलाबाची भेटनिर्मिती केलेली नाटके एकच प्याला, तुफानाला घर हवंय 

पटवर्धनांची भूमिका असलेले चित्रपटअंकुश (हिंदी), अशा असाव्या सुना उंबरठा, दयानिधी संत भगवान बाबा ज्योतिबा फुले, झाँझर (हिंदी), तक्षक (हिंदी), तेजाब (हिंदी), नरसिंह (हिंदी), प्रतिघात (हिंदी), बिनकामाचा नवरा, सिंहासन हमला (हिंदी), हरी ओम विठ्ठला 

दोन दिवसांपूर्वी आमचे बोलणे झाले होते. त्या वेळीं पटवर्धन यांनी मला तू भेटायला येऊ नको, असे भोवतालच्या परिस्थितीमुळे सांगितले होते. आम्ही दोघे मूळचे गिरगावचे. माझ्या आधी ते ठाण्यात राहायला आले. गिरगावला आम्ही दोघे थोड्या अंतरावर राहत होतो. बालपणी आमची ओळख होती, पण खरी मैत्री झाली ती नाटकानिमित्ताने. ६० ते ६५ वर्षे मैत्रीचा आनंद आम्ही दोघांनी उपभोगला. ‘तुझं आहे तुजपाशी’चे असंख्य प्रयोग आम्ही केले.   - जयंत सावरकर,  ज्येष्ठ रंगकर्मी १५ दिवसांपूर्वी पटवर्धन यांच्यासोबत फोनवर बोलत होतो. त्यावेळी त्यांनी नाटकात पुन्हा एकदा काम करण्याची तयारी दाखवली. कोरोनानंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करू, असे मी त्यांना म्हणालो होतो. - अशोक समेळ, ज्येष्ठ लेखक, रंगकर्मीमी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना अनेकदा भेटलो होतो. त्यांचा आणि माझा वैयक्तिक स्नेह होता. सांस्कृतिक ठाणे शहराच्या जडणघडणीत त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. अशा बहुआयामी कलावंतांला तमाम ठाणेकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. - नरेश म्हस्के, महापौर, ठाणे शोकसंवेदना ‘आरण्यक’मधील धृतराष्ट्र, पुलंच्या अजरामर ‘तुजं आहे तुजपाशी’मधील दिलखुलास काकासाहेब यांसारख्या अनेक संस्मरणीय भूमिका साकारणारे, तसेच वयाच्या ८२व्या वर्षीही रंगभूमीवर तितक्याच ताकदीने उभे राहणारे, अस्सल ठाणेकर रवी पटवर्धन यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.- एकनाथ शिंदे, पालकमंत्रीदूरदर्शनवरील आमची माती आमची माणसं, गप्पा गोष्टी अशा विविध कार्यक्रमांतून तसेच हिंदी, मराठी चित्रपटांतून व रंगभूमीवर, मालिकेतून रवी पटवर्धन यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षक वर्गाला आपलेसे केले होते. पन्नास वर्षे एक कलावंत म्हणून सतत ते कार्यरत होते. शिवाय सामाजिक कामातही त्यांचा पुढाकार होता. माझी आणि त्यांची जेव्हा भेट होई त्यावेळी विविध विषयांवर त्यांच्यासोबत मनमोकळेपणे गप्पा होत असत. ठाणेकरांवर नेहमी त्यांनी प्रेम केले आहे. शिवाय ठाणेकरांनीही त्यांना भरभरून प्रेम दिले.- आ. संजय केळकर 

टॅग्स :marathiमराठीcinemaसिनेमा