शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल पाठवण्याचे ठाणे जि. प.सीईओंचे आदेश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 18:01 IST

सातपुते यांनी प्रत्येक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून  नुकसान झालेल्या शेतीचा अहवाल तातडीने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व  शासनाकडे  सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, यांना दिले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून  शेतकऱ्यांनी गटशेती करावी, असे मार्गदर्शन ही त्यांनी केले आहे.  

ठाणे - जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागाच्या शहापूर तालुक्यातील बहुतांशी शेतकर्‍यांच्या भात पिकांचे करपा व कडाकरपा या रोगाने नुकसान झाले आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) रुपाली सातपुते, यांनी कुंडनपाडा, उंबरमाळी, अजनुप गावातील शिवारात जाऊन या भात शेतीच्या नुकसानीची पाहाणी केली. या नुकसान चा तत्काळ पंचनामे करुन तो अहवाल पाठवण्याचे आदेश ही त्यांनी कृषी खात्यास दिले आहे.  

यंदा  या दुर्गम भागातील भात शेतीचे करपा व कडाकरपा रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची  दखल घेत सातपुते यांनी प्रत्येक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून  नुकसान झालेल्या शेतीचा अहवाल तातडीने ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व  शासनाकडे  सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, यांना दिले आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून  शेतकऱ्यांनी गटशेती करावी, असे मार्गदर्शन ही त्यांनी केले आहे.  काही दिवसांपूर्वी कृषि तज्ज्ञांची समिती गठीत करून या समितीची टीम प्रत्येक्ष घटनास्थळी येऊन नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली. यामध्ये आठ ते दहा शेतकऱ्यांचे अंदाजे ३.१५ हेक्टर क्षेत्रावर किडरोग झाल्याचे आढळून आले.  यावेळी समितीने कीड का लागली याचा अहवाल  देत  उपायोजना सुचविल्या आहेत. याशिवाय या रोगाची गाभीर्याने दखल घेत या समितीही काही दिवस आधी या गावांना भेटी देऊन रोखाचे कारण शोधल्याचा विषय या सीईओंच्या चर्चे दरम्यान उघड झाला आहे. शेतात पाणी साठल्या मुळे व सतत पडणाऱ्या पावसामुळे करपा व कडाकरपा रोगाचा या  भात शेतीवर प्रादुर्भाव झाल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. या पाहाणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य देवराम भगत, पंचायत समिती सदस्य राजेश कांबळे, उपसरपंच  सचिन निचिते, कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, कृषि अधिकारी विलास घुले आदी अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.

साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने रोग शेतकऱ्यांनी जयश्रीराम, जोरदार, रुपम, दप्तरी -१००८ , शबरी, वायएसआर व स्थानिक सुधारीत वाणाच्या भाताची लागवड केल्याचे निदर्शनात आले. त्यावर औषधी फवारणी केली. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे रोगाची तीव्रता कमी न झाल्याचे शेतकऱ्यांनी उघड केले आहे.

टॅग्स :thaneठाणे