शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

स्थायी सभापतीपदावरून सेना-भाजप आमनेसामने, २२ मार्च रोजी नव्या सदस्यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 08:28 IST

उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून त्यामध्ये भाजपचे नऊ, शिवसेना पाच तर रिपाइं व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. स्थायी समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजपतील बंडखोर उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा देऊन सभापतीपदी निवडून आणले.

उल्हासनगर:  उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होत असून त्यांच्या जागी २२ मार्च रोजी नवीन सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समितीत भाजपचे बहुमत राहणार असून सभापती पदावरून पुन्हा शिवसेना-भाजप आमनेसामने उभे ठाकणार आहे.उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून त्यामध्ये भाजपचे नऊ, शिवसेना पाच तर रिपाइं व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. स्थायी समितीमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजपतील बंडखोर उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा देऊन सभापतीपदी निवडून आणले. समितीच्या एकूण १६ पैकी आठ सदस्य एक एप्रिल रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड २२ मार्चच्या सभेत होणार आहे. स्थायी समिती सभापतीपद पक्षाकडे राहण्यासाठी भाजप कट्टर समर्थक सदस्यांना पाठविणार आहे. भाजपमधील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवकांना स्थायी समिती पासून दूर ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे विशेष समिती सभापतींच्या निवडणुकीप्रमाणे भाजप पक्षातील बंडखोर ओमी टीम समर्थक नगरसेवक सोबत जुळवून घेत असल्याचेही बोलले जात आहे. पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होणार असून स्थायी समिती सभापतीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी शिवसेना राजकीय डावपेच आखत आहेत. शिवसेनेचे राजेंद्रसिंग भुल्लर, लिलाबाई अशान, ज्योती गायकवाड, भाजपचे विजय पाटील,जमनुदास पुरस्वानी, प्रकाश नाथानी तर रिपाइंच्या अपेक्षा भालेराव व राष्ट्रवादी पक्षाचे भारत गंगोत्री निवृत्त होणार आहेत. 

जाणकारांचे लक्ष  स्थायी समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापतीपदाची निवड होणार आहे. सभापती पदासाठी शिवसेना व भाजप आमनेसामने उभे ठाकणार असून, या निवडणुकीत ओमी कलानी टीम महत्त्वाची भूमिका वठविणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या निवडणुकीकडे एकूणच राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाShiv Senaशिवसेना