शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

निवडणूक अ‍ॅपवरही सेल्फींचा भडीमार; ‘सी-व्हिजील’वरील ८६ तक्रारी कराव्या लागल्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:07 AM

निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या उद्देशाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत ‘सी-व्हिजील’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. या अ‍ॅपवर तक्रार आल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांमध्ये कारवाई होत आहे.

ठाणे : निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, या उद्देशाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत ‘सी-व्हिजील’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. या अ‍ॅपवर तक्रार आल्यानंतर अवघ्या १०० मिनिटांमध्ये कारवाई होत आहे. परंतु, आचारसंहिता लागू झाल्यापासून या अ‍ॅपवर आचारसंहिता उल्लंघन केल्याच्या तक्रारींपेक्षा अनेकांनी सेल्फी शेअर केल्याने निवडणूक विभाग बुचकळ्यात पडला आहे. काहींनी चक्क वैयक्तिक तक्रारींचा सूर या अ‍ॅपवर लावला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये या अ‍ॅपविषयी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लघंन होऊ नये, यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावले उचलण्यात आली आहेत. निवडणुकीच्या काळात बेकायदा पोस्टर, बॅनर लावले किंवा आचारसंहिता भंग होत असल्याचे एखादे प्रकरण असेल, तर प्रत्येक नागरिकाला तत्काळ तक्रार करता यावी, या उद्देशाने ‘सी-व्हिजील’ हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. या अ‍ॅपवर आतापर्यंत १३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील केवळ ४७ तक्रारी या ग्राह्यधरण्यात आल्या आहेत. उर्वरित ८६ तक्रारी या रद्द करण्यात आल्या आहेत.१५ जणांनी चक्क आपले सेल्फी काढून ते या अ‍ॅपवर पाठवले आहेत. काहींनी एखाद्या बॅनरपुढे उभे राहून सेल्फी काढले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली. काहींनी केवळ अंधारातील रस्त्यांची छायाचित्रे पाठवली आहेत. ज्यांचा आचारसंहिता भंगाशी काहीही संबंध नाही. अशा बिनबुडाच्या तक्रारी रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.अशी करावी तक्रार...एखादे पोस्टर, बॅनर किंवा एखाद्याकडून आचारसंहिता भंग होत असल्यास त्याचे छायाचित्र काढून या अ‍ॅपवर पाठवायचे आहे. छायाचित्र धाडताना ते नेमके कोणत्या भागातील आहे, याचा उल्लेख करण्यात यावा, हे अभिप्रेत आहे. तसेच आचारसंहिता भंगाचा तपशील कमीतकमी शब्दांत लिहून अ‍ॅपवर पाठवावा, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.100मिनिटांत तक्रारीवर होते कारवाईया अ‍ॅपवर तक्रार आल्यानंतर ही तक्रार ज्या भागातून आली आहे, त्या भागातील निवडणूक विभागातील पथकाद्वारे फ्लाइंग स्क्वॉडकडे पाठवली जाते. त्यानंतर, पुढील १५ मिनिटांत फ्लाइंग स्क्वॉड घटनास्थळी धाव घेते. त्यानंतर, त्यावर योग्य ती कारवाई झाल्यावर त्याची इत्थंभूत माहिती ही ४५ मिनिटांमध्ये मुख्य निवडणूक विभागाला दिली जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणे