शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या यादीत २६४३ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:29 IST

२७ जूनपर्यंत प्रवेश घ्या; पालकांना सूचना

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दुर्बल घटकातील मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशासाठीची दुसरी शनिवारी आॅनलाइन यादी जाहीर केली आहे. या यादीत २ हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १७ जून ते २७ जूनपर्यंत शाळा प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यातील कायम विना अनुदानित सर्व प्रकारच्या, सर्व माध्यमांच्या तसेच सर्व मंडळांशी संलग्न शाळांमध्ये (अल्पसंख्यांक शाखा वगळून) आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. २०१८- २०१९ या शैक्षणिकवर्षात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रि या आॅनलाईन करण्याचे प्रस्तावित केले असून ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेदेखील २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका आणि पाच तालुक्यातील शाळांनी आॅनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पटसंख्येची माहिती भरली होती. तसेच पालकांनीदेखील आॅनलाईन पद्धतीने आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल केले होते.मुदतीत अर्ज न केल्यास फेरविचार नाहीपहिल्या फेरीत ५ हजार ८९६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ ३ हजार ९६७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. आता १५ जून रोजी दुसरी यादी जाहीर झाली असून यामध्ये २ हजार ६४३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पहिलीच्या वर्गासाठी १ हजार ९८८ तर, प्रि-प्रायमरीसाठी ६५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्यास त्याचा पुढील फेरीत विचार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.पालकांनी हे करावेअर्जदारांनी मोबाइलवर संदेश आला नसेल, त्यांनी स्वत:च्या लॉगिनमधील अ‍ॅडमिट कार्ड या आॅपशनमध्ये जाऊन ते प्राप्त करून घ्यावे. तसेच शाळेत प्रवेश घेण्यासाठी जातांना सर्व ओरीजनल कागदपत्रे सोबत घेवून जावे. शाळा प्रवेशासंबंधीत काही तक्र ारी असल्यास याच काळात संबंधीत तालुका व जिल्हा परिषद ठाणे येथे शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे अवाहन शिक्षण विभगाने करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीनंतर तक्र ार घेवून आल्यास त्याचा विचार करण्यात येणार नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा