शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील १४० रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भंडारा जिल्यात झालेला प्रकार अत्यंत खेदजनक असून असून राज्यात अशी अनेक रु ग्णालये सुरू ...

ठळक मुद्देभंडारा दुर्घटना : ठाणे अग्निशमन दलही करणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भंडारा जिल्यात झालेला प्रकार अत्यंत खेदजनक असून असून राज्यात अशी अनेकरु ग्णालये सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यारखी पुनरावृत्ती ठाण्यातही होण्याची भीती व्यक्त होत आहे. ठाण्यातील तब्बल १४० खासगीरु ग्णालयांकडे फायर एनओसी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अग्निशमन दलाकडून पुन्हा अशा रुग्णालयांचा आढावा घेतला जाणार असून त्यांना कारवाईची नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीठाण्यातील खासगी रु ग्णालयांना फायर एनओसी नसल्यामुळे अशी नामांकित १४० रु ग्णालये ४८ तासांची नोटीस देऊन सील करण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाला न्यायालयाने दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ही सर्व रु ग्णालये आजही सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वी याबाबत काही कार्यकर्त्यांनी अग्निशमन अधिकारी आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली असता तीन रु ग्णालये सील केली. मात्र, काही तासात ती पुन्हा खुली करण्यात आली. दरम्यान, या संदर्भात पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरु डकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.ठाणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यासंदर्भात म्हणाले, २०१९ मध्ये न्यायालयाच्या आदेशाने अग्निसुरक्षेचे नियम न पाळणाºया रुग्णालयांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. यातील काही रुग्णालयांनी अटी शर्थींचे पालन केल्यामुळे त्यांना हे फायर एनओसी देण्यात आले आहे. परंतू, यातील किती जणांनी घेतले आणि किती बाकी आहेत? याचा आढावा घेतला नसल्याचीही त्यांनी कबूली दिली. तो आढावा लवकरच घेण्यात येणार असून उर्वरित रुग्णालयांना पुन्हा नोटीस बजावाली जाणार असल्याचेही ते म्हणाले.* जिल्हा रु ग्णालयाची सुरक्षा यंत्रणा भक्कमठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय आणि ठाणे महानगर पालिकेचे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणा सक्षम आणि पुरेशा असल्याचा दावा या रुग्णालयांनी केला आहे.जिल्हा रु ग्णालयाची आगरोधक सुरक्षा यंत्रणा भक्कम असून तिची वेळेवर दुरु स्ती आणि लेखापरीक्षण केले जाते. रु ग्णालयातील सर्व सिलिंडरचे फेब्रुवारी महिन्यात रिफिल केले आहेत. या रु ग्णालयात अशी दुर्दैवी घटना घडू नये, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. सध्या जिल्हा रु ग्णलयात कोविड रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या येथे उपचार केले जातात. या रुग्णालयात बालकांसाठी १६ खाटांची सुविधा असल्याचे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यFire Brigadeअग्निशमन दल