शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ उपअभियंत्याला महापालिकेत घेण्यासाठी सेनेची दुसरी लॉबी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:34 IST

नाकारलेले प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत पुन्हा आर्थिक तरतुदीसाठी ठेवल्याने उपअभियंता रूपेश पाडगावकर यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली होती.

ठाणे  - नाकारलेले प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत पुन्हा आर्थिक तरतुदीसाठी ठेवल्याने उपअभियंता रूपेश पाडगावकर यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यांना निलंबित करण्यासाठी शिवसेनेच्या एका लॉबीने हट्ट केला होता. परंतु, आता त्याच उपभियंत्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी दुसऱ्या गटाने आयुक्तांकडे धाव घेतल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.            ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागामध्ये उपअभियंता असलेल्या पाडगावकर यांच्याकडे बजेट व्यवस्थापनाचीही जबाबदारी होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडून आर्थिक स्थितीप्रमाणे कामाचे प्राधान्यक्रम निश्चित केले आहे. त्यानुसार कामांची यादी तयार करून त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद  करण्यात येते.  संबंधित उपअभियंत्यांनी या कामांव्यतिरिक्त इतर कामांना अर्थसंकल्पीय तरतूद केली. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या ठरावाच्या अंमलबजावणीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच काही कामांसाठी निधी टाकण्यासाठीही त्यांच्यावर शिवसेनेच्या काही वरिष्ठ नगरसेवकांचा दबाव होता. परंतु, त्यांनी या नगरसेवकांची मर्जी राखली नसल्याने अखेर आयुक्तांकरवी या उपअभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली होती.निलंबनाच्या या कारवाईवरून आता शिवसेनेतच जुंपली आहे. या कारवाइईनंतर दाेन गट आमनेसामने आल्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद उफाळून ताे चव्हाट्यावर आला आहे. ठाण्याच्या राजकारणात हा अंतर्गत वाद काय वळण घेताे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे