लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय सर्व वरिष्ठ नेत्यांनी घेतला असून, युती अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच जागावाटपाची घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट मत शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी व्यक्त केले. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
आनंद आश्रम येथे शिंदेसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली. यावेळी म्हस्के यांनी हे भाष्य केले. ते म्हणाले की, महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. सध्या विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, योग्यवेळी जागावाटप जाहीर होईल. युती आणि जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतात. सध्या प्रक्रिया सुरू असून, कुठेही जागावाटपाचा तिढा नाही. उमेदवार निवडताना संघटनात्मक काम, निवडून येण्याची क्षमता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद हे निकष असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे बंधूंना शुभेच्छाठाकरे बंधूंना एकत्र येण्याकरिता म्हस्के यांनी शुभेच्छा दिल्या. निवडणुकांच्या काळात अशा युती-आघाड्या होत असतात. याआधी उद्धवसेनेने काँग्रेसला जवळ केले, आता मनसेला जवळ करत आहेत. ही धरसोड वृत्ती जनतेच्या लक्षात आली आहे. काही जण केवळ त्यांचा फायदा घेत आहेत हे काँग्रेसच्याही लक्षात आले असेल. उद्धवसेनेकडे जनाधार नाही, हेही त्यांच्या लक्षात आले असावे. त्यामुळेच ते मुंबईत स्वबळावर लढणार असे सांगताहेत, असे ते म्हणाले.
मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी हाच त्यांचा विचारमुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असा उद्धवसेनेचा दृष्टिकोन आहे. मुंबईबाहेर त्यांच्या नेत्यांनी कधी लक्ष दिले नाही. फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित करून सत्ता कशी मिळवायची, हाच त्यांचा एकमेव विचार असल्याचीही टीका त्यांनी केली.
Web Summary : Seat allocation will be announced after the official Mahayuti alliance declaration, stated Shinde Sena MP Naresh Mhaske. He also wished the Thackeray brothers well. He criticized Uddhav Sena for focusing solely on Mumbai for power.
Web Summary : शिंदे सेना सांसद नरेश म्हस्के ने कहा कि महायुति की आधिकारिक घोषणा के बाद ही सीट बंटवारे की घोषणा की जाएगी। उन्होंने ठाकरे बंधुओं को शुभकामनाएं दीं। उन्होंने उद्धव सेना पर सत्ता के लिए केवल मुंबई पर ध्यान केंद्रित करने की आलोचना की।