शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या खाडीत वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 21:00 IST

‘हिरानंदानी इस्टेट’ येथील खाडीमध्ये २० मे रोजी बुडालेल्या हर्षद भोई या मुलाचा आठव्या दिवशीही पोलिसांकडून शोध सुरुच होता. शनिवार आणि रविवारी खासगी बोटींच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी हा तपास केला.

ठळक मुद्देआठ दिवस उलटलेपोलिसांनी खासगी बोटींद्वारे केला तपासघोडबंदर रोड खाडीतील घटना

ठाणे : घोडबंदर रोडवरील खाडीत आठवड्यापूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या वाघबीळ येथील पितापुत्रांपैकी हर्षद भोई (७) या मुलाचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्याचा कासारवडवली पोलिसांनी खासगी बोटींच्या साहाय्याने शनिवारी आणि रविवारी आठव्या दिवशीही शोध घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.घोडबंदर रोडवरील ‘हिरानंदानी इस्टेट’ येथील खाडीमध्ये २० मे रोजी ब्रह्मांडमधील धर्माचापाडा येथील राजेश भोई आणि त्यांचा मुलगा हर्षद हे पितापुत्र बुडाले होते. बरीच शोधाशोध केल्यानंतर दोघांपैकी वडिलांचा मृतदेह हाती लागला. आठवडा उलटूनही मुलाचा शोध मात्र लागलेला नाही. राजेश भोई हे मुलगा हर्षद तसेच काही साथीदारांसमवेत रविवारी हिरानंदानी इस्टेट येथील खाडीमध्ये मासेमारीसाठी गेले. खाडीला जिथे नाल्याचे पाणी मिळते, तिथे भोई मुलामुळे थांबले. पण, नंतर ते तिथल्या चिखलात रुतले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पती आणि मुलगा न परतल्यामुळे भोई यांच्या पत्नीने कासारवडवली पोलिसांच्या मदतीने त्या भागात शोधाशोध केली. तेव्हापासून ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनही शोध मोहीम राबवण्यात आली. सोमवारी २१ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास राजेश यांचा मृतदेह मिळाला. मात्र, हर्षदचा शोध लागला नाही.दरम्यान, २६ मे रोजीही कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी, पोलीस नाईक सचिन खटे, कॉन्स्टेबल संतोष गायकवाड यांनी वाघबीळ येथील चंद्रकांत पाटील यांची खासगी बोट घेऊन दोन खलाशांच्या मदतीने वाघबीळ ते कोलशेत, कोलशेत ते गायमुख आणि गायमुख ते वाघबीळ या मार्गावरून शोध घेतला. रविवारी मासेमारी करणाऱ्या २० ते २५ जणांकडे पोलिसांच्या चमूने चौकशी केली. कोणीही मासेमारीसाठी खाडीत गेल्यास त्यांना हर्षदबाबतची कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाWaterपाणी