शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-विमानतळ कॉरिडॉरसाठी सल्लागाराचा शोध सुरू; उन्नत कॉरिडॉर ठरणार गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 08:02 IST

प्रकल्प सुमारे २६ किलोमीटर लांबीचा असणार असून बहुतांश भाग उन्नत स्वरूपात बांधण्यात येणार आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ठाणेदरम्यान उन्नत आणि अखंड रस्ता उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय व तांत्रिक परवानग्या मिळविण्याच्या उद्देशाने सिडकोने तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.

डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उत्तर मुंबई भागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या भागातून विमानतळाकडे थेट, जलद आणि सिग्नलमुक्त मार्ग उपलब्ध नसल्याने प्रवाशांना सध्या ठाणे-बेलापूर मार्ग, पाम बीच रोड किंवा अन्य पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत आहे.  परिणामी, वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने ठाणे-विमानतळदरम्यान उन्नत कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.  

नव्या मार्गाचा फायदा काय?प्रकल्प सुमारे २६ किलोमीटर लांबीचा असणार असून बहुतांश भाग उन्नत स्वरूपात बांधण्यात येणार आहे. या मार्गामुळे ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवासाचा वेळ सध्याच्या ८०-९० मिनिटांवरून थेट ३० ते ४५ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. हा मार्ग पूर्णपणे सिग्नलमुक्त होणार आहे.

उन्नत कॉरिडॉर ठरणार गेमचेंजरसल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध शासकीय विभागांकडून आवश्यक मंजुरी मिळविण्याचे काम वेगाने हाती घेतले जाईल. मंजुरी प्रक्रिया पूर्ण होताच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन यशासाठी हा उन्नत कॉरिडॉर अत्यंत निर्णायक व गेमचेंजर ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. 

वाहतूक व्यवस्थेला नवा आयामनवी मुंबई विमानतळ परिसरात सध्या मेट्रो रेल्वे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) जोडरस्ते, सायन-पनवेल महामार्ग विस्तारीकरण, उलवे-विमानतळ किनारी मार्ग तसेच वेस्टर्न एन्ट्री इंटरचेंज यासारखे अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्प सुरू आहेत. या सर्व प्रकल्पांना ठाणे-विमानतळ उन्नत कॉरिडॉरची जोड मिळाल्यास वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवासीस्नेही होणार आहे.

८,००० कोटींचा खर्च अपेक्षितसिडकोच्या अंदाजानुसार, प्रकल्पासाठी सुमारे ८,००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, सल्लागार नियुक्तीनंतर तयार होणाऱ्या  प्रकल्प अहवालातून प्रकल्पाची अंतिम रचना, अचूक खर्च, तांत्रिक आराखडे आणि अंमलबजावणीची टप्प्याटप्प्याची योजना निश्चित केली जाणार आहे. भूसंपादन, पर्यावरणीय परिणाम, वाहतूक व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहार्यता या बाबींचा अभ्यास करूनच कार्यवाही होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thane-Airport Corridor: Consultant Search Begins; Elevated Corridor a Game-Changer

Web Summary : CIDCO seeks a consultant for the Thane-Navi Mumbai Airport elevated corridor. The 26km project will slash travel time from 80-90 minutes to 30-45. Costing ₹8,000 crores, it promises signal-free connectivity, boosting the new airport's success and integrating with other transport projects.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईthaneठाणे