शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाकडून 84 दुकाने सील; ९२ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:50 IST

मालमत्ताकर, पाणीकर थकीत

ठाणे : प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणीपुरवठा कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून पहिल्या टप्प्यात दिव्यातील कर न भरणारी ८४ दुकाने व १० निवासी खोल्या सील केल्या असून ९२ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. शिवाय ३७९ थकबाकीधारकांना डिमांड नोटीस बजावली आहे. १४ ते १७ डिसेंबर २०२० या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्यावतीने २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ताकर आणि पाणीदेयकांच्या तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे. यासाठी प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्टे दिली आहेत. दिवा प्रभाग समितीमध्ये करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त महेश आहेर यांनी करवसुलीकरिता धडक मोहीम हाती घेऊन थकबाकीदारांवर ही कठोर कारवाई सुरू केली आहे. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.यापूर्वी केली आहे विक्रमी वसुली लॉकडाऊनमुळे ठामपाचे उत्नन्नाचे स्त्रोत पूर्णत: ठप्प झाले होते. मात्र, अनलॉक सुरू झाल्यानंतर आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन उत्पन्न वाढीचे आदेश दिले. सुटीच्या दिवशी कार्यालये उघडी ठेवली. तसेच विशेष व्हॅनही तैनात केली. शिवाय पालिकेच्या जाळ्यात नसलेल्या मालमत्ता शोधण्याचेही आदेश दिले होते.  आयुक्तांच्या या आदेशामुळे याचा सकात्मक परिणाम दिसून आला. कोरोना असूनही महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकराचे तब्बल ३६० कोटी तसेच पाणीपट्टीचे ६५ कोटी वसूल झाले. शिवाय नव्या दीड हजार मालमत्तांचा शोध घेेऊन त्यांना नव्याने मालकत्ताकर लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. थकबाकीदारांची यादी तयारठामपाने मालमत्ताकर आणि पाणीपट्टी न भरणार्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. यात माेठे, मध्यम आणि कमी थकबाकी असलेले असे वर्गृीकरण करून त्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून प्रसंगी मालमत्ता सील करणे, त्यांचा लिलाव करणे, अशी प्रक्रिया केली जाणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका