शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वैभवच्या शॉर्ट फिल्मचे जागतिक महोत्सवात स्क्रिनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 06:18 IST

बेस्ट युरोपियन सिनेमॅटोग्राफी अ‍ॅवॉर्डसाठीही नॉमिनेशन

- स्नेहा पावसकर ठाणे : कॉलेज फेस्टिव्हलमधून सुरू केलेली फोटोग्राफी त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आणि न्यूयॉर्क येथे सिनेमॅटोग्राफीचे प्रशिक्षण घेतल्यावर त्याने तयार केलेल्या ‘मर्सी’ या शॉर्ट फिल्मने त्याला हॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. वैभव हंडोरे याच्या यशाची ही कथा. मूळचा कल्याणकर आणि शिक्षणानिमित्त अमेरिकेत असलेल्या वैभवने केलेली मर्सी ही शॉर्ट फिल्म हॉलिवूडची सफर करणार आहे. जागतिक स्तरावरील दोन महोत्सवांसाठी या शॉर्ट फिल्मची निवड झाली आहे.वैभव याने के.जे. सोमय्यातून बीएमएमचा कोर्स पूर्ण केला. फोटोग्राफीमध्ये आवड निर्माण झाली आणि मग करिअरच्या दृष्टीने त्याने फोटोग्राफीचे तंत्रशुद्ध शिक्षण घ्यायचे ठरवले. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फोटोग्राफीमधून कोर्स पूर्ण केल्यावर सिनेमॅटोग्राफीचेही शिक्षण घेतले. हॉलिवूडमध्ये काम कसे चालते, हे शिकण्यासाठी त्याने अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. सध्या तो इंटर्नशिप करतो आहे. याचदरम्यान त्याने ‘मर्सी’ ही शॉर्ट फिल्म तयार केली. आयुष्यात येणाऱ्या विविध संकटांत एक पत्नी आपल्या पतीला पाठिंबा देताना स्वत: किती संघर्ष करते, यावर आधारित ही फिल्म आहे. विशेष म्हणजे वैभवने ही फिल्म ३५ एमएमच्या फिल्म कॅमेऱ्यातून आणि एका दिवसात शूट केलेली आहे. वैभवच्या या शॉर्ट फिल्मची लॉस एंजेलिस येथे होणाºया गोल्डन स्टेट फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली असून त्यात ही शॉर्ट फिल्म चायनीज थिएटरमध्ये दाखवली जाणार आहे. तसेच बेस्ट युरोपियन सिनेमॅटोग्राफी अ‍ॅवॉर्डसाठीही त्याचे नॉमिनेशन झाले आहे. या दोन्ही महोत्सवांसाठी माझ्या शॉर्ट फिल्मची झालेली निवड ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. मी केवळ आवड म्हणून उत्तम काम करण्याचा प्रयत्न करतो.यापुढेही इंडियन फिल्म इंटस्ट्री आणि हॉलिवूड दोन्हीसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे, असे मत वैभवने व्यक्त केले.