शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘नासा’ संस्थेतील शास्त्रज्ञाचा कल्याणमधील विद्यार्थ्यांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 00:16 IST

स्पेस टेक्नॉलॉजीची दिली माहिती; मुलांनीही विचारले प्रश्न

कल्याण : अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेतील जॉर्ज सालझार या शास्त्रज्ञाने कल्याणच्या केम्ब्रीआ शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सालझार यांनी स्पेस टेक्नॉलॉजी या किचकट विषयावर संवाद साधत त्याचे पैलू अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.शालेय शिक्षणासोबत पुस्तकबाह्य शिक्षण केम्ब्रीआ शाळेत विद्यार्थ्यांना दिले जाते. सालझार यांनी दोन तास वेबिनारद्वारे हा संवाद साधला. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यात एक पुसटशी रेषा आहे. विज्ञानाद्वारे निसर्ग समजून घेण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी सतत प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे मत सालझार यांनी व्यक्त केले.गणित, विज्ञान आणि खगोलशास्त्र यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना यावेळी समजावून सांगण्यात आले. अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी, अभ्यास, ठोकताळे, अमेरिकेची चंद्रावरची ऐतिहासिक अपोलो मोहीम, पूर्वी आणि आताचे अंतराळ तंत्रज्ञान, कम्युनिकेशन सिस्टीम, सूर्यमाला, हबल दुर्बीण यासारख्या विषयांची माहिती त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना दिली. तर, सालझार यांना अंतराळ, ब्लॅक होल्स, टाइम मशीन, मंगळ ग्रह, पृथ्वीवरील आणि अंतराळातील वेळांमध्ये असणारा फरक, रॉकेट तंत्रज्ञान, गुरुत्वाकर्षणाचा शरीरावर होणारा परिणाम यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले.मुुलांना प्रश्न पडले पाहिजेत, हाच या वेबिनारचा मुख्य उद्देश होता, असे शाळेचे प्रमुख बिपिन पोटे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी भविष्यातही असे वेगळे उपक्रम राबवण्यात येतील, असे शाळेतर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :NASAनासा