शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान प्रदर्शन : रेल्वेप्रमाणे अनाउन्समेंट अथवा फाटकाचा रस्त्यांवरही असावा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:39 IST

सिग्नलवर राहणा-या आणि सिग्नल शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या या मुलांनी तयार केलेला ‘स्मार्ट सिग्नल’ हा विज्ञान प्रकल्प महापालिका शिक्षण विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात सादर झाला

स्नेहा पावसकर ठाणे : सिग्नलवर राहणा-या आणि सिग्नल शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या या मुलांनी तयार केलेला ‘स्मार्ट सिग्नल’ हा विज्ञान प्रकल्प महापालिका शिक्षण विभागाच्या विज्ञान प्रदर्शनात सादर झाला असून तो अनेकांची पसंती मिळवतो आहे. सिग्नलवर राहत असताना तेथील समस्या, अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजना का नाही, अशा प्रकारच्या मुलांच्या विचारातूनच हा प्रकल्प साकारला आहे.ठाणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांचा विज्ञान प्रदर्शन सोहळा कळवा येथील शाळा क्र. ६९, ७० मध्ये शुक्रवारपासून सुरू झाला आहे. या प्रदर्शनात अनेक शाळांचे प्रकल्प असून लक्षवेधी ठरत आहे, तो सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांचा ‘स्मार्ट सिग्नल’ प्रकल्प. सिग्नलच त्यांचे जीवन असल्याने तेथील ट्रॅफिक, वाहनांची वर्दळ, कर्कश हॉर्न आणि याबरोबरच दररोज होणारे छोटेमोठे अपघात त्यांच्यासाठी रोजचे झाले आहेत. सिग्नल शाळेच्या माध्यमातून ही मुले शिकती झालीत. मात्र, या रोज घडणाºया घटनांवर विशेषत: रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी काहीतरी तोडगा निघावा. रेल्वे वाहतुकीत जशा अनाउन्समेंट होतात किंवा फाटक बंद होते, तसे काहीतरी रस्ते वाहतुकीबाबत असावे, अशी या मुलांची कल्पना. यालाच अनुसरून प्रकल्प करण्यात आला. वाहनांना हिरवा सिग्नल मिळालेला असला, तरी अनेक पादचारी रस्ता क्रॉस करतात. हे पादचारी आणि वाहनचालकाच्या जीवावर बेतते. यावर तोडगा म्हणून या स्मार्ट सिग्नल प्रकल्पात सिग्नल पिलरच्या बाजूला एक लाइट डिपेंडेंट सेन्सॉर बसवला आहे.एखादी व्यक्ती वाहने जात असतानाही रस्ता क्रॉस करत असेल, तर अशा वेळी हा सेन्सॉर व्यक्तीची प्रतिकृती हेरून अ‍ॅलार्म किंवा बझर देतो. यामुळे रस्ता क्रॉस करणाºया व्यक्तीलाही आपल्याला धोका असल्याचे लक्षात येईल. हा अ‍ॅलार्म त्यात्या सिग्नलवरील ध्वनिपातळी लक्षात घेऊन निश्चित करता येणार आहे. तसेच या अ‍ॅलार्मची माहिती वाहतूक नियंत्रण कक्षालाही मिळणार आहे. मुख्य म्हणजे हे यंत्र सौरऊर्जेवर चालणारे असून त्यासाठी फार खर्च होणार नाही. या सेन्सॉरमुळे अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात तरी कमी होईल, असा विश्वास या मुलांना आहे.तंत्रज्ञानाच्या वापरासाठी रोबेटिक्स टीमचे साहाय्य मिळाले आहे. विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याचे सिग्नल शाळेच्या मुलांचे हे दुसरे वर्ष आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका