शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील शाळा आज गजबजणार, पुष्प देऊन होणार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 04:35 IST

ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा शुक्रवार, १५ जूनपासून सुरू होत असून पहिली ते आठवीच्या एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थ्यांचे आपापल्या शाळेत पुष्प देऊन स्वागत होणार आहे.

ठाणे - जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा शुक्रवार, १५ जूनपासून सुरू होत असून पहिली ते आठवीच्या एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थ्यांचे आपापल्या शाळेत पुष्प देऊन स्वागत होणार आहे. याशिवाय, आयोजित केलेल्या स्वागत समारंभात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते आठ लाख ८४ हजार ३६५ पुस्तकांचे वाटप केले जाणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी लोकमतला सांगितले.यंदाच्या या शैक्षणिक वर्षापासून पहिली व आठवीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. तरीदेखील या नवीन अभ्यासक्रमांची पुस्तकेही वेळेत विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली. नवीन अभ्यासक्रमांनुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ५५ हजार ७८७ पुरस्तकांची मागणी केली आहे. यापैकी ४४ हजार ८५५ पुस्तकांची गाडी आज सायंकाळी पंचायत समित्यांमध्ये पुस्तकांचे वाटप करत आहे. आठवीच्या नवीन अभ्यासक्रमांची पुस्तके आधीच प्राप्त झाली असून एक लाख ६० हजार २८८ पुस्तकांपैकी एक लाख ५८ हजार ४३० पुस्तकांचा जिल्ह्यात पुरवठा झाला.जिल्हा परिषदेच्या एक हजार ३६१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह माध्यमिक व आश्रमशाळेच्या एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थ्यांना या आठ लाख ८४ हजार ३६१ विद्यार्थ्यांना शासनाकडून क्रमिक पुस्तकांचे मोफत वाटप होणार आहे.यामध्ये मराठी भाषिक माध्यमासह इंग्रजी, हिंदी, उर्दू, तामिळ आणि तेलुगू भाषिक माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या भाषिक माध्यमांतील भिवंडी तालुक्यातील ३९ हजार ६४२ विद्यार्थ्यांसह अंबरनाथच्या ४२ हजार ५६०, कल्याणच्या २१ हजार ८९३, मुरबाडच्या २२ हजार ५६१ आणि शहापूरच्या ४० हजार ५९५ विद्यार्थ्यांनापहिली ते आठवीच्या वर्गांची पुस्तके मोफत वाटप होणार आहेत.दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण करून ठेवली होती अशी माहितीही यावेळी देण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये उत्साहपहिली व आठवीच्या वर्गांप्रमाणेच दुसरीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना ५५ हजार ७८७ पुस्तके मागणीनुसार मिळाली आहेत. तिसरीच्या वर्गातील ८० हजार ४७३ पुस्तकांच्या मागणीपैकी ८० हजार ३९६ पुस्तके मिळाली. चौथीच्या वर्गाकरिता एक लाख आठ हजार २६६ पुस्तके मिळाली.पाचवीसाठी एक लाख २७ हजार ८५६, सहावीसाठी एक लाख ५१ हजार ५२८ आणि सातवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांना एक लाख ५७ हजार २४७ पुस्तकांचा पुरवठा विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे. पुस्तके कशी असतील याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पसरलेला आहे. 

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा