शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या महिला लिपीकाने केला पाच लाख ९८ हजारांच्या रकमेचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:27 IST

विद्यार्थ्यांनी दिलेले मासिक शुल्क शाळेत भरणा करण्याऐवजी पाच लाख ९८ हजारांच्या रकमेचा अपहार करणाऱ्या अवनी घाडी या महिला लिपीकाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देठाण्यातील घटनानौपाडा पोलीस ठाण्यातील घटना गेली वर्षभर सुरु होता अपहार

ठाणे: पाचपाखाडी येथील सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील सुमारे ६१ विद्यार्थ्यांचे पाच लाख ९८ हजारांचे शुल्काची रक्कमेचा अपहार करणाऱ्या अवनी घाडी (३२, रा. सागाव, डोंबिवली) या महिला लिपीकाविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.घाडी या लिपीक महिलेकडे विद्यार्थ्यांचे शुल्क जमा करण्याची जबाबदारी होती. विद्यार्थ्यांचे रोख स्वरुपात पैसे जमा केल्यानंतर पालकांना ती रितसर पावती देखील द्यायची. पण संबंधित पालक किंवा विद्यार्थी निघून गेल्यानंतर संगणकातून त्यांची नोंद काढून टाकायची. कालांतराने ठराविक विद्यार्थ्यांचे शुल्क भरले न गेल्याचे शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आले. तेंव्हा त्यांनी या ६१ विद्यार्थ्यांच्या पालकांकडे विचारणा केली. या पालकांनी शालेय शुल्क भरल्याचा दावा करीत शाळेकडूनच देण्यात आलेल्या पावत्याही सादर केल्या. शाळेने चौकशी सुरु केल्यानंतर तिने एका विद्यार्थ्याचे २० शुल्क भरण्यासाठी आपल्याच पतीच्या धनादेशाचा वापर करीत त्यावर त्या विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता आणि तुकडी असा तपशीलही टाकला. एक धनादेश वटला. पण इतर धनादेश वटलेच गेले नाही. शाळेच्या चौकशीत तथ्य आढळल्यानंतर तिला कामावरुन कमी करण्यात आले. शाळेतील रेकॉर्डसाठी असलेली पावती ही शाळेच्या संगणकातील ई- सुविधा या सॉफ्टवेअरमाून रद्द करुन सुमारे पाच लाख ९८ हजारांचे शुल्क हे शाळेच्या बँक खात्यात जमा न करता त्याचा अपहार करुन स्वत:कडेच ठेवल्याचेही शाळेच्या चौकशीत समोर आले. जानेवारी ते डिसेंबर २०१८ या काळात हा प्रकार सुरु होता. डिसेंबरमध्ये शाळेने तिच्यावर कारवाई करुन याप्रकरणी तिच्याविरुद्ध शालेय प्रशासनाच्या वतीने १६ मार्च २०१९ रोजी फसवणूक आणि अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी