शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

शाळांची स्वच्छता खाजगी संस्थांकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:43 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३६ शाळांतील स्वच्छता व सुरक्षितता खाजगी संस्थांच्या हाती देण्याचा प्रस्ताव १८ जुलैच्या महासभेत प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ३६ शाळांतील स्वच्छता व सुरक्षितता खाजगी संस्थांच्या हाती देण्याचा प्रस्ताव १८ जुलैच्या महासभेत प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. या संस्थांनी पालिका शाळांना वेळोवेळी आवश्यक मदत करावी, अशी अपेक्षाही बाळगण्यात आली असून त्यामागे शाळांतील सुमार दर्जा उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.शहरातील विविध ठिकाणच्या २२ इमारतींत पालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू माध्यमांच्या ३६ शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत चार हजार ५११, हिंदी माध्यमात दोन हजार ५९५, गुजराती माध्यमात ३४१ व उर्दू माध्यमात एक हजार २२२ असे एकूण आठ हजार ६६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी २०२ शिक्षकांची पदे मंजूर असली तरी प्रत्यक्षात १८० शिक्षक सध्या कार्यरत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा शिक्षण विभाग अस्तित्वात असून त्याचा कारभार राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेले शिक्षणाधिकारी व पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सुरू आहे. याखेरीज पालिकेकडे स्वतंत्र पर्यवेक्षण यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे पालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा वाढवण्यासह शाळांत विविध उपक्रम व भौतिक सुविधा पुरवण्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी खाजगी संस्थांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा निर्णय महापौर डिम्पल मेहता, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, आयुक्त बालाजी खतगावकर, शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी मुंबई व मीरा-भार्इंदरमधील खाजगी संस्थांची मदत घेण्याचे निश्चित केले. या संस्थांद्वारे पालिका शाळांतील स्वच्छता व सुरक्षिततेवर विनामूल्य काम करणे गृहीत धरण्यात आले असून मात्र त्यांचा पालिकेच्या तसेच शाळेच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षतासुद्धा घेण्याचे प्रस्तावित केले आहे.>विनामोबदला सेवाशाळेला वेळोवेळी आवश्यकता भासल्यास त्या संस्थांद्वारे शैक्षणिक मदत, शाळेसह शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी बालक-पालक प्रबोधन आदी पूरक सेवा त्या संस्थांना द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी त्या संस्थांना पालिकेकडून कोणताही मोबदला दिला जाणार नसल्याचे प्रस्तावात स्पष्ट केले आहे. त्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून त्याच्या मान्यतेसाठी तो येत्या महासभेपुढे सादर केला जाणार आहे.