शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:13 IST

विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; रांगोळ्यांचे सडे, तोरणांची सजावट

ठाणे : सुटी संपून सोमवारपासून शाळा सुरू झाल्या. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत पहिल्यांदाच पाऊ ल ठेवले. त्यांचे स्वागत दणक्यात आणि अनोख्या स्वरूपात करण्यात आले. काही शाळांच्या प्रवेशद्वारांवर मिकी माउस, डोरेमॉन, छोट्या भीमसह अनेक कार्टूनही सज्ज झाली होती. काही शाळांमध्ये फुलांसह आंब्यांच्या पानांचे तोरण बांधून सजावट करण्यात आली होती. शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांचे औक्षण तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचेही वाटप करण्यात आले. तसेच वर्गात विविध खेळणी आणि खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. मात्र, काहींचा आई-बाबांचा हात सोडताना डोळे पाणावले होते. सोमवारी शहर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये असेच वातावरण होते. प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नवा डबा, नवे दप्तर, वह्या-पुस्तके यांची नवलाई होतीच, मात्र सुटीनंतर मित्र-मैत्रिणींना भेटण्याची उत्सुकताही दिसत होती.पूर्व प्राथमिक गटातील विद्यार्थी प्रथमच पालकांसोबत शाळेत आले होते. त्यांच्यासाठी येथील वातावरण पूर्णत: अनोळखी असल्याने त्यांच्याकडून आई-वडिलांचा हात सुटत नव्हता. शाळांनी पहिला दिवस साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली होती. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औंक्षणाने करण्यात आले. खेळीमेळीचे वातावरण राहण्यासाठी मुलांच्या आवडीच्या कार्टून्सना पाचारण करण्यात आले होते.सुटी असल्याने दोन महिन्यांपासून शांत असलेला शाळांचा परिसर पुन्हा गजबजून गेला होता. कुठे हुंदक्यांचा आवाज, तर कुठे हसण्याचा आवाज येत होता. शाळेच्या प्रवेशद्वारावर काही पालक रडणाºया मुलांना खाऊचे आमिष दाखवताना दिसत होते.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण