शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील शाळा सॅटेलाइटने जाेडणार - दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 13:46 IST

राज्यातील माझी ई-शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात भिवंडीतून करण्यात आली.

भिवंडी : काेराेनाकाळात आदिवासी आणि दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षण देताना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला हाेता. सरकारतर्फे राज्यभरातील सर्व शाळा सॅटेलाइटने जाेडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भविष्यात दुर्गम भागातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीतील अडचणी दूर करण्यात येणार आहेत. राज्यभरात डिजिटल शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती शनिवारी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.राज्यातील माझी ई-शाळा या डिजिटल साक्षर मिशन अभियानाची सुरुवात भिवंडीतून करण्यात आली. शनिवारी भिवंडीतील काल्हेर जिल्हा परिषद शाळेत या अभियानाचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम इन्फोटेक फाउंडेशन, जिल्हा परिषद ठाणे व राज्य सरकारच्या समग्र शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह एल अँड टी, प्रथम फाउंडेशनचे अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.केसरकर म्हणाले की, स्किल डेव्हलपमेंट महत्त्वाचे असून शाळा सॅटेलाइटने जोडण्यात येणार आहेत. शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेली अक्षरे विद्यार्थ्यांच्या मोबाइल ॲपवर संग्रहित होणार आहेत. तशी टेक्नॉलॉजीही लवकरच राज्यात विकसित करण्यात येणार असल्याचेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.

मातृभाषेतून शिक्षणामुळे फायदाकेसरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘मातृभाषेतून शिक्षण’ ही नवीन शिक्षण पद्धती अमलात आणली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेणे शक्य होणार आहे. त्याचा इंजिनिअरिंग व मेडिकलच्या अभ्यासक्रमातही फायदा होणार आहे. तसेच इंग्रजी भाषेचा आपल्यावर असलेला पगडाही हळूहळू कमी होणार आहे. अनेक देशांत स्थानिक मातृभाषेतून शिक्षण घेत असल्याने ते शिक्षणात व आर्थिक सुबत्तेत अग्रेसर आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना व्यासपीठावरच झापले शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर आयएएस दर्जाचे अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी चर्चा करीत होते. त्यामुळे केसरकर यांना भाषण करताना व्यत्यय येत हाेता. त्यामुळे त्यांनी भाषण थांबवून अधिकाऱ्यांना तेथेच झापले. ‘मंत्र्यांचे भाषण सुरू असताना आपसांत बोलणे चुकीचे आहे. मी एक वरिष्ठ मंत्री आहे. मी हे खपवून घेणार नाही. यापुढे लक्षात ठेवा,’ अशी कानउघाडणी केसरकर यांनी केली.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर SchoolशाळाthaneठाणेStudentविद्यार्थी