शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू, पण ST बंद; विद्यार्थ्यांची रोज सात-आठ किलोमीटर पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:19 IST

आजारी विद्यार्थ्यांना होतो त्रास; शिक्षणावर परिणाम

जनार्दन भेरेभातसानगर : एसटी बंदचा फटका शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांना बसत असल्याने शिक्षणासाठी सहा ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळा व विद्यालयांमध्ये जाण्यासाठी दररोजची पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थी हैराण झाले असून पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

एसटी बंद असल्याने भातसानगर माध्यमिक विद्यालयात कळमगाव कानविंदे, लाहे, बिरवाडी या गावातील विद्यार्थ्यांना सहा ते सात किलोमीटर अंतरावरून चालत यावे लागत आहे. किसान हायस्कूल नडगाव येथील हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी शिरगाव, शेंद्रूण, जांभे, लेनाड, नेहरोली, ठिळे हायस्कूलमध्ये टेभरे, किन्हवली हायस्कूलमध्ये परिसरातील यापेक्षा अधिक अंतरावरून खर्डी, कसारा अशा तालुक्यांतील सर्वच हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोजची पायपीट करून शाळेत यावे लागत आहे.

काही शाळा सकाळी सात ते आठच्या दरम्यान भरतात दुपारी सुटतात, तर काही भरून संध्याकाळी सुटतात. त्या विद्यार्थ्यांना सकाळी एक तास आधीच घरातून निघावे लागत आहे. तर दुपारी भर उन्हात चालत यावे लागत आहे. संध्याकाळी सुटणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरी येण्यासाठी रात्र होत असते. दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ येत असल्याने थकलेली मुले लवकर झोपी जातात. जाण्या-येण्याने आधीचा वेळही वाया जातो. याशिवाय दूर गावांना जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठी ससेहोलपट होत असून अनेक यात्रा करणाऱ्या भाविकांना ही एसटी नसल्याने जाता येत नाही. शिवाय, खासगी बस या परवडणाऱ्या नसल्याने सर्वांची मोठी पंचाईत झाली आहे.

दीक्षा गोरे या आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या किसान हायस्कूलच्या विद्यार्थिनीने सांगितले की, एसटी बंद असल्याने आम्हाला दररोज सहा किलोमीटर पायी चालत जावे लागत आहे. हा दररोजचा प्रवास असल्याने आम्ही थकून जातो. तर शुभम पाटोळे या विद्यार्थ्यानेही ही अशीच प्रतिक्रिया दिली.बस बंद असल्याचा मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे; मात्र खासगी जीप ही वेळेवर नसल्याने मुलांची ससेहोलपट होत आहे.वैदेही नार्वेकर, माजी नगराध्यक्षखासगी प्रवासाचा भुर्दंड

  • महामारीनंतर तालुक्यातील सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. आता बस बंदचा मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. 
  • दररोजच्या चाकरमानी, नाकाकामगार, शासकीय कर्मचारी यांच्याबरोबरच दररोजच्या रोजी-रोटीसाठी शहराकडे जाणाऱ्यांना स्वतःची वाहने नसल्याने व पेट्रोल, डिझेल यांचे गगनाला भिडलेल्या भावामुळे परवडणारे नसल्याने त्यांचीही एसटी बंदमुळे मोठी कोंडी झाली आहे. 
  • आदिवासी कातकरी यांना खासगी जीपचे दर परवडणारे नसल्याने त्यांचीही मोठी पंचायत झाली आहे. शिवाय खासगी जीपवाले अधिक भाडे आकारणी करीत असल्याने आर्थिक ताण पालकांच्या खिशावर पडत आहे.
टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र