शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागांत टंचाईच्या झळा तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 03:03 IST

उपाययोजना मात्र कागदावरच : जिल्ह्यातील ३३१ बोअरवेलचे प्रस्ताव धूळखात

सुरेश लोखंडेठाणे : उपलब्ध पाणीपुरवठ्याची कमतरता लक्षात घेऊन महापालिकांसह औद्योगिक क्षेत्रासाठी नोव्हेंबरपासूनच पाणीकपात सुरू झाली. या शहरी कपातीपेक्षाही जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील ८८ गावे आणि २३० आदिवासीपाड्यांमध्ये पाणीटंचाई कमीअधिक प्रमाणात सुरू झाली आहे. यावरील उपाययोजनेचा आराखडा मात्र अजूनही धूळखात पडून आहे.

शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचे ग्रामीण, दुर्गम भागात जाळे पसरले आहे. मात्र, त्यापासून जवळ असलेल्या गावखेड्यांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जी व निष्काळजीमुळे भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहातील पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या नाहीत. अर्धवट असलेल्या या योजनांच्या गावातील पाणीटंचाईवरील उपाययोजनेसाठी साधी बोअरवेलही घेता येत नाही. यंदाही ८८ गावे आणि २३० पाडे आदी ३१८ गावपाड्यांमध्ये यंदा तीव्र पाणीटंचाई भासत आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यासाठी सुमारे ३३१ बोअरवेल घेण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, हा प्रस्ताव सत्ताधारी व अधिकाºयांच्या निरुत्साहामुळे धूळखात पडून आहे.

जिल्हा कागदोपत्री टँकर व पाणीटंचाईमुक्त आहे. मात्र, दरवर्षी शेकडो गावे या पाणीटंचाईमुळे होरपळले जात आहेत. यंदाप्रमाणे मागील वर्षीदेखील ४४८ गावखेड्यांमधील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचे नियोजन केले होते. यामध्ये १२१ मोठी गावे आणि ३२७ पाड्यांचा समावेश होता. त्यासाठी सहा कोटी रुपये खर्चाचे नियोजन केले होते. तरीही, बहुतांशी गावपाडे या उपाययोजनांपासून वंचित ठेवल्याचे सदस्यांकडून ऐकायला मिळत आहे. यंदा शहापूर तालुक्यातील सर्वाधिक ६५ गावे आणि १८३ पाडे पाणीटंचाईच्या चक्रव्यूहात आहेत. त्यावरील उपाययोजनेसाठी सुमारे ६८ बोअरिंग घेण्याचे नियोजन आहे. याखालोखाल मुरबाड तालुक्याच्या दुर्गम व डोंगराळ भागातील १८ गावे आणि ३३ पाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ६४ बोअरिंग निश्चित केल्या आहेत.भिवंडीतील तीन गावांमध्ये ठणठणाटभिवंडी तालुक्यात तीन गावे आणि सहा पाड्यांवर पाणीटंचाई आहे. त्यासाठी या तालुक्यामध्ये यंदा सुमारे ११० बोअरवेलचे नियोजन आहे. अंबरनाथमध्ये दोन गावे आणि आठ पाडे टंचाईग्रस्त म्हणून आहेत. या तालुक्यांमध्ये ४५ बोअरवेल घेतल्या जाणार आहेत. कल्याण तालुक्यातही यंदा ४५ बोअरिंग घेण्याचे नियोजन आहे. प्राप्त निधीअभावी या बोअरवेलची संख्या कमी होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली. पण, या टंचाईवरील उपाययोजना मंजुरीअभावी अद्याप कागदावर आहे. त्यावर वेळीच लक्ष केंद्रित करून जीवघेणी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका