शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

सावरकर आमच्या आदरस्थानी एकनाथ शिंदेंनी केली भूमीका स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:34 PM

पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यासाठीविचार करु, तसेच पोलिसांच्या कामाचे तास कमी कसे करता येतील आणि त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचीही ग्वाही राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठळक मुद्देपोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढविण्याचा विचार करणार- गृहमंत्र्यांची ग्वाही गृहमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर ठाण्यातील पोलीस वसाहतींचा केला पहिलाच पाहणी दौरा डागडुजीची गरज असल्याचे महिलांनी मांडले गा-हाणे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: स्वातंत्र्यवीर सावरकर हे राज्याचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. त्याविषयी शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, असे परखड मत राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले. पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यासाठीविचार करु, तसेच पोलिसांच्या कामाचे तास कमी कसे करता येतील आणि त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचीही ग्वाही शिंदे यांनी दिली.काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने भाजप सरकारने गदारोळ केला होता. त्याला उत्तर देताना गृहमंत्री शिंदे यांनी वरील वक्तव्य केले. ठाण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील पोलीस कर्मचारी वास्तव्यास असलेल्या जरीमरी पोलीस वसाहतीला शिंदे यांनी रविवारी दुपारी भेट दिली. गृहमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. पोलीस वसाहती आणि पोलीस कर्मचारी यांचे राहणीमान सुधारावे, यासाठी अनेक मोठी पाऊले उचलणार असल्याचीही त्यांनी यावेळी ग्वाही दिली. सुमारे १०२ वर्षांच्या ब्रिटीशकालीन पोलीस वसाहतीसह १९९२ चे बांधकाम असलेल्या तळ अधिक तीन मजली आणि २०११ चे बांधकाम असलेल्या नविन पोलीस वसाहतींचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार तसेच १०० ते १५० पोलीस कुटंूबीय यावेळी उपस्थित होते. अनेकांनी यावेळी वसाहती जुन्या असल्यामुळे त्यांच्या डागडुजीची गरज असल्याचे गाºहाणे मांडले. उंदीर घुशींचा प्रादुर्भाव, ड्रेनेजच्या टाक्यांची अस्वच्छता आणि मेन्टनस वेळेत न होणे आदी समस्यांचा पाढाच गृहमंत्र्यांपुढे वाचला. तर काही महिलांनी पोलीस भरतीमध्ये मुलांना सध्याचे पाच टक्क्यांचे आरक्षण वाढवून देण्याची मागणी केली. त्यावर सर्व पोलीस वसाहतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून गरज पडल्यास तातडीने डागडुजी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रश्नही प्राधान्य तत्वावर सोडविण्याचा प्रयत्न करणार असून त्यांच्या कामाचे तासही कमी कसे होतील, हे पाहण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलीस बांधव उन पावसाची तमा न बाळगता अविरत सेवा देतात त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पावसात अनेक इमारतींच्या प्रसाधनगृहांची दुरवस्था झालेली असते त्यावर तातडीने उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. शिंदे यांनी अनेक घरांमध्ये वैयक्तिकरित्या जाऊन पोलीस कुटूंबियांशी संवाद साधल्याने या पोलीस कुटूंबियांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस