शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरवरून सरनाईक यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 00:24 IST

शेठ ग्रुपच्या सेंटरबाबत बैठक; लाचलुचपत विभागाकडे चौकशीची मागणी

ठाणे : शेठ ग्रुपच्या वाहनतळामध्ये कोविड सेंटर उभे राहत आहे. त्यावर भाजप गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेणे गरजेचे होते. मात्र वाघुले अथवा किरीट सोमय्या यांनी तसे केले नाही. कॅडबरी येथील शेठ ग्रुपच्या कार्यालयात वाघुले यांची त्यांच्या सल्लागाराबरोबर मिटिंग झाल्याचे सीसीटीव्ही फूटेज आपल्याकडे आले असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रारीद्वारे केली.एका ‘प्रतापी’ आमदाराच्या हट्टामुळे व्होल्टास येथील कोविड सेंटरचे काम चालू असल्याचा आरोप वाघुले यांनी बुधवारी केला होता. त्याचा समाचार सरनाईक यांनी घेतला. व्होल्टास आणि शेठ ग्रुपच्या वाहनतळामध्ये उभी राहत असलेली दोन्ही कोविड सेंटर माझ्या मतदारसंघातच येत असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. परंतु वाघुले यांनी फक्त व्होल्टास कंपनीच्या जागेवर होत असलेल्या कोविड सेंटरबद्दल आक्षेप घेतला असून, त्यामध्ये त्यांना भ्रष्टाचाराचा वास येत आहे. व्होल्टास येथील सेंटरचा खर्च १३ कोटी आणि शेठ ग्रुपच्या वाहनतळामधील सेंटरचा खर्च २३ कोटींचा आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने व महासभेत या दोन्ही कोविड सेंटरना मंजुरी मिळालेली आहे, याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले.  दरम्यान, ठाण्यात सेना-भाजपमध्ये चांगलेच राजकारण तापू लागले आहे. वाघुले यांची खोपट येथील हायवेनजीक असलेल्या देवकार्पोरा इमारतीमधील शेठ ग्रुपच्या कोविड सेंटरच्या कार्यालयात सल्लागारांसोबत बैठक झाल्याचे सीसीटीव्ही फूटेज आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.  त्यामुळे केवळ व्होल्टास येथील कोविड सेंटरबद्दल आक्षेप घेण्यामागे भ्रष्टाचार तर नाही ना, अशी शंका सरनाईक यांनी बोलून दाखवली.  या प्रकरणी सोमय्या व वाघुले या दोघांची चौकशी करावी, अशी विनंती त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली आहे.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक