शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सपतील इच्छुकांना धाडले काँग्रेसमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:31 IST

पालिकेत सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या समाजवादी पक्षात ऐन निवडणुकीत वाद उफाळून आल्याने त्याचा नेमका कोणाला फायदा होणार व कोणाला फटका बसणार हे निवडणूक निकालनंतर स्पष्ट होणार आहे.

भिवंडी : समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे  आ. रईस शेख व समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू असीम आझमी या दोघांमधील संघर्षाचा फटका समाजवादी पक्षाला भिवंडीत बसला आहे. आ. शेख यांच्या मर्जीतील इच्छुक उमेदवारांना आझमी यांनी उमेदवारी नाकारल्याने शेख यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करत समाजवादीतील इच्छुकांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समाजवादीतील इच्छुकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केले. 

पालिकेत सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या समाजवादी पक्षात ऐन निवडणुकीत वाद उफाळून आल्याने त्याचा नेमका कोणाला फायदा होणार व कोणाला फटका बसणार हे निवडणूक निकालनंतर स्पष्ट होणार आहे.

भिवंडीत महायुती ५२ तर काँग्रेस ६४ जागा लढविणारभिवंडी : भाजप-शिंदेसेना युती शहरात ५२ जागा लढवणार असून भाजप ३२ व शिंदेसेना २० जागा लढवणार आहे. तर काँग्रेस ६४ जागा, समाजवादी ६२ जागा लढवणार आहे. उद्धवसेना व मनसे ५२ जागा लढवणार असून उद्धवसेना ४० तर मनसे १२ जागा लढवणार आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) ४५ जागा तर राष्ट्रवादी (अजित पवार) ३४ जागा लढवणार असल्याची माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठाण्यात कॉंग्रेसने दिले ९५ उमेदवारमहाविकास आघाडीमध्ये बोलणी फिस्कटल्यानंतर स्वबळाचा नारा दिलेल्या कॉंग्रेसने ठाणे महापालिकेकरिता ९५ उमेदवार रिंगणात उतरवले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेसने ठाण्यात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली होती. सुरुवातीला ३५ जागांची मागणी केली होती. तडजोडीत त्यांनी २५ जागा तरी सोडाव्यात अशी भूमिका घेतली. कॉंग्रेसला १० जागांची ऑफर दिली. ठाण्यात कॉंग्रेसचे अस्तित्व असल्याने कॉंग्रेसचा योग्य सन्मान करावा, अशी भूमिका शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी घेतली होती. अखेर महाविकास आघाडीतून फारकत घेत कॉंग्रेसने ९५ जागा लढविण्याचे जाहीर केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Welcomes Samajwadi Party Aspirants Amid Internal Bhivandi Conflict

Web Summary : Bhivandi Samajwadi Party rift led to Rais Shaikh's loyalists joining Congress after denied nominations. Mahayuti contests 52 seats, Congress 64. Congress fields 95 Thane candidates after alliance talks failed, prioritizing local presence.
टॅग्स :Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक २०२६bhiwandiभिवंडी