शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी

By अजित मांडके | Updated: November 1, 2023 16:03 IST

आता कर्मचाऱ्यांच्या आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ठाणे : येत्या काही दिवसांवर दिवाळी आली असल्याने ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या यूनियन आक्रमक झाल्या आहेत. महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता याचे नियोजन कसे करावे असा पेच तूर्तास महापालिकेला सतावत आहे. परंतू  सानुग्रह अनुदानासाठी येणारा खर्च पालिकेला पेलावा लागणार आहेच. त्यात आता सानुग्रह अनुदान किती द्यावे या बाबतचा निर्णय आता महापालिकेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टोलवला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.           ठाणे महापालिकेत ८५०० च्या आसपास कर्मचारी आहेत. तसेच कंत्राटी स्वरुपात अडीच हजारांच्या आसपास कर्मचारी वर्ग आहे. तसेच ठाणे परिवहन सेवा, बालवाडी आदींसह इतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे लागणार आहे. मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान मिळाले होते. यंदा म्यूनिसीपल लेबर युनियनने २५ हजार रुपये मिळावे अशी मागणी लावून धरली आहे. त्यावर अदयाप काही तोडगा निघालेला नाही. मागील वर्षी १८ हजार या प्रमाणे पालिकेच्या तिजोरीवर साधारपणे १६ ते १८ कोटींचा बोजा पडला होता अशी माहिती पालिकेतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. आता २५ हजार रुपयांची मागणी झाल्याने ती तरी पूर्ण होऊ शकणार नाही. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एक ते दोन हजारांची वाढ यात अपेक्षित धरण्यात आली आहे. तसे झाल्यास साधारपणे १९ ते २० हजारांच्या आसपास  सानुग्रह अनुदान पालिका कर्मचाऱ्यांना मिळू शकणार आहे. तसेच कंत्राटी स्वरुपातील कर्मचाऱ्यांना एक पगार मिळू शकणार आहे. तसे झाल्यास पालिकेच्या तिजोरीवर भार हा २७ ते ३० कोटींच्या आसपास जाऊ शकणार असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.            ठाणे महापालिकेची सध्या आर्थिक परिस्थिती पाहता, उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यात अद्यापही पालिकेला यश आलेले नाही. त्यातही तिजोरीत जेमतेम रक्कम शिल्लक आहे. त्यामूळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याची पालिकेची इच्छा असली तरी ती किती गोड करावी याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच घ्यावा असे मानले जात आहे. मागील वर्षी देखील शिंदे यांनी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली होती. यंदा देखील आता मुख्यमंत्री शिंदे हे जी रक्कम निश्चित करतील ती पालिकेला अदा करावी लागणार आहे. पंरतू सध्या शिंदे यांच्या व्यस्त कार्यक्रमामूळे पालिकेला देखील त्यांच्या सोबत चर्चा करता आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र येत्या दोन तीन दिवसात चर्चा होऊन पूढील आठवड्यात पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल असा आशावाद पालिकेने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाDiwaliदिवाळी 2022Eknath Shindeएकनाथ शिंदेEmployeeकर्मचारी