शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी यंदाही रद्द; 'आरोग्य उत्सव' साजरा होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 14:35 IST

Sanskriti Pratishthan Dahihandi : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द करण्यात आली असून याऐवजी 'आरोग्य उत्सव' साजरा होणार आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. 

ठाणे : ठाण्यात संस्कृती युवा प्रतिष्ठान दरवर्षी मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन करतात. संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी जगप्रसिद्ध आहे. मात्र यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता दहीहंडी उत्सवावर अनेक निर्बंध आणले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी रद्द करण्यात आली असून याऐवजी 'आरोग्य उत्सव' साजरा होणार आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी जगप्रसिद्ध आहे. कोरोनाचे सावट अजून आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई ठाण्यातही रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर्षीही आमची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. याऐवजी 'आरोग्य उत्सव' साजरा करणार आहोत. पण, रात्री १२ वाजता दहीहंडीचा छोटा उत्सव साजरा करु, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

याचबरोबर, ठाण्यामुळे जगात दहीहंडी उत्सव पोहोचला. ठाणे दहीहंडीचे माहेर घर आहे. हा उत्सव रद्द करणे, हे आम्हाला त्रासदायक आहे. पण लोकांच्या जीवाशी खेळ न करता यंदा आम्ही दहीहंडी रद्द करत आहोत. गोविंदांच्या जीवाशी आयोजकांनी खेळू नये. आयोजकांना विनंती आहे की, त्यांनी दहीहंडीचे आयोजन करु नये. काही जण निवडणूका डोळ्यासमोर दहिहंडी साजरी करतात. दहीहंडीमध्ये गाजावाजा करतात पण नंतर कुठेच दिसत नाहीत असे म्हणत प्रताप सरनाईक यांनी मनसेला टोला लगावला.

आजही 'या' वक्तव्यावर ठाम - प्रताप सरनाईक शिवसेनेने भाजपाशी जुळवून घ्यावे नाही तर शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर मंत्र्यांवर गुन्हे दाखल होतील, केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागेल, असे पत्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. यावर बोलताना प्रताप सरनाईक यांनी शिवसेना आणि भाजपाने एकत्रित यावे या वक्तव्यावर मी आजही ठाम आहे, असे सांगितले. दरम्यान, प्रताप सरनाईक यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मी एवढा मोठा नाहीये अशी प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीpratap sarnaikप्रताप सरनाईकthaneठाणे