शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांत संजय घरत यांची तब्बल 17 तास चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 10:11 IST

घरत यांना ठाणे येथे नेण्यात आले असून  दुपारी अडीच वाजता कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कल्याण : तब्बल सतरा तासांच्या चौकशी अंती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना सकाळी ८ च्या सुमारास त्यांच्या दालनामधून बाहेर काढण्यात आले.  घरत यांना ठाणे येथे नेण्यात आले असून  दुपारी अडीच वाजता कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ५२ पानांचा दस्ताऐवज पोलिसांनी तयार केला आहे. अजूनही तपासणी सुरूच आहे. रात्री त्यांच्या डोंबिवलीत मिलाप नगर येथील घरी छापा टाकण्यात आला होता..या तपासाअंती करोडो रुपयांची माया समोर येण्याची संभावना आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत (५१) यांच्यासह दोघा लिपिकांना बुधवारी आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती. लाचखोरी प्रकरणात महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याविरोधात ही कारवाई झाली आहे. सात मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी घरत यांच्यासह ललित आमरे (४२) आणि भूषण पाटील (२७) या दोघा लिपिकांनी तक्रारदाराकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती ३५ लाख देण्याचे ठरले. त्यापैकी आठ लाखांचा पहिला हप्ता बुधवारी दुपारी ३ वाजता पालिका कार्यालयात स्वीकारताना त्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तिघांनाही गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली.

दरम्यान, लाचलुचपत विभागाने घरत यांच्या दोन गाड्यांची कसून झडती घेतली. त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले.राज्यमंत्र्यांशी जवळीक घरत यांची मंत्रालयापर्यंत ‘पोच’ असल्याची चर्चा नेहमी पालिका वर्तुळात रंगत असे. एका राज्यमंत्र्यांच्या ते जवळचे असल्याचे मानले जात. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई झाल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.२३ वर्षांत ३१ लाचखोर केडीएमसीच्या १९९५च्या लोकप्रतिनिधी राजवटीपासून आजपर्यंत २३ वर्षांच्या कालावधीत ३१ लाचखोर अधिकारी, कर्मचारी तर दोन आजी-माजी नगरसेवकांना लाच प्रकरणात अटक झाली आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSanjay Gharatसंजय घरतblack moneyब्लॅक मनी