शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

संजय घरत यांची एसीबी चौकशी सुरू, केडीएमसीची लपवाछपवी, तक्रारदाराला वापरावा लागला माहितीचा अधिकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 06:10 IST

केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची लाचलुचपत विभाग (एसीबी) कडून गेल्या दोन महिन्यांपासून चौकशी सुरू असल्याची माहिती ही माहिती अधिकारात अखेर उघड झाली आहे. केडीएमसीने घरत यांच्या चौकशीची माहिती दडवल्याचा आरोप तक्रारदार सुलेख डोण यांनी केला आहे.

कल्याण : केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची लाचलुचपत विभाग (एसीबी) कडून गेल्या दोन महिन्यांपासून चौकशी सुरू असल्याची माहिती ही माहिती अधिकारात अखेर उघड झाली आहे. केडीएमसीने घरत यांच्या चौकशीची माहिती दडवल्याचा आरोप तक्रारदार सुलेख डोण यांनी केला आहे. घरत यांची चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही दुजोरा दिला आहे.दरवर्षी सादर केल्या जाणाºया विवरणपत्रात पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता त्यांनी नमूद न करता दडवल्याबद्दल घरत यांच्याविरोधात कल्याणमधील नागरिक सुलेख डोण यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. यावर केडीएमसीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या अहवालात योग्य माहिती न दिल्याने घरत यांच्या मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करणे उचित होईल, असा अहवाल महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने सरकारला दिला होता. परंतु, डोण यांनीही लाचलुचपत प्रतिबंधकविभागाचे महासंचालक यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, ठाणे विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, चौकशी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही ही माहिती महापालिकेने दडवल्याचा आरोप डोण यांनी केला आहे.वारंवार महापालिकेच्या संबंधित विभागाकडे चौकशी केली असता चौकशीचे पत्र आले नसल्याचे सांगण्यात येत होते. अखेरीस डोण यांनी माहितीचा अधिकार वापरला, तेव्हा मात्र चौकशीचे पत्र देण्यात आल्याचे डोण यांना सांगण्यात आले. यासंदर्भात लोकमतने सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी.एस. सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. पालिकेकडे लाचलुचपत विभागाने काही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.घरत हे नेहमीच त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच वादग्रस्त राहिले आहेत. ज्या विभागांची त्यांनी खातेप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली, त्यातील बहुतांश विभागांमध्ये त्यांना आपल्या कार्याचा सक्षमपणे ठसा उमटवता आला नाही. तसेच काही विभागांत त्यांच्या कार्यकाळात घोटाळे झाल्याच्या तक्रारी केल्या गेल्या. बीएसयूपी प्रकरणात लाभार्थी यादी बनवण्यात केलेली दिरंगाई असो अथवा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठेवलेला ठपका असो, घरत हे वादात सापडले. माजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली होती. आयुक्तांनंतर अतिरिक्त आयुक्त हे पालिका प्रशासनातील सर्वाेच्च पद आहे. अतिरिक्त आयुक्तपदाच्या अधिकार कक्षा मोठ्या आहेत तसेच निर्णय घेण्याची क्षमताही आहे. असे असतानाही घरत यांनी कार्यक्षमता दाखवली नसल्याचे म्हणणे आहे.सुलेख डोण यांनी विविध ठिकाणी माझ्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. न्यायालयातदेखील याचिका दाखल केली आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही. माझी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असल्याबद्दलही मी अनभिज्ञ आहे.- संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, केडीएमसी