शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘मौज’चे संजय भागवत यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:35 IST

मुंबईतील मौज प्रकाशन गृहचे संपादक-प्रकाशक संजय भागवत यांचे रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

ठाणे  - मुंबईतील मौज प्रकाशन गृहचे संपादक-प्रकाशक संजय भागवत यांचे रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी भाग्यश्री, मानसोपचारतज्ज्ञ मुलगी मनवा, मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारा मुलगा अनिरुद्ध आणि मोठे भाऊ श्रीकांत असा परिवार आहे.१९९७ पासून ते २०१५ पर्यंत संजय भागवत यांनी प्रकाशक म्हणून ‘मौज’ची धुरा सांभाळली. १९९७ च्या आधी ते ‘मौज’च्या प्रिंटिंग विभागात काम करत होते. २०१५ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांच्यावर अंधेरीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच रुग्णालयाच्या ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील युनिटमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.उत्कृष्ट प्रकाशकांसाठी देण्यात येणाऱ्या श्री. पु. भागवत या राज्य पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील सहार रोडवरील पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये सोमवारी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांचे थोरले बंधू श्रीकांत भागवत यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :thaneठाणे