शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी जमातीच्या न्याय हक्कासाठी धुळे ते मंत्रालय मुंबई दरम्यान संघर्ष पदयात्रा

By नितीन पंडित | Updated: November 26, 2023 16:40 IST

टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार समाज भिवंडीत दाखल

भिवंडी: राज्य घटनेने अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण दिलेल्या महाराष्ट्रातील विशेषत: खान्देश भागातील टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या आदिवासी समाजबांधवांना जातीच्या दाखल्यापासून वंचित ठेवले जात आहे. तर अनेकांची जात पडताळणी केली जात नाही. त्यामुळे आज ही समाजातील मोठा वर्ग सोयी सुविधा पासून वंचित असल्याने त्या न्याय हक्का साठी धुळे ते मुंबई मंत्रालय येथ पर्यंत संघर्ष पदयात्रेचे आयोजन आदिवासी वाल्मीकलव्य सेना प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आले आहे.धुळे येथील एकवीरा मंदिर येथून १७ नोव्हेंबर पासून सुरू झालेली ही पदयात्रा रविवारी भिवंडी तालुक्यात दाखल झाली. सोनाळे येथे पदयात्रेत सहभागी समाज बांधवांचे राम लहारे,देवा फाऊंडेशन चे तानाजी मोरे,साई सेवा संस्थेचे विसुभाऊ म्हात्रे यांनी स्वागत करून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित खान्देश भागातील असताना आदिवासी असल्याचा आरक्षणाचा फायदा त्यांनी घ्यायचा व आम्हाला मिळू द्यायचा नाही असे षडयंत्र सुरू आहे .त्यासाठी ही संघर्ष यात्रा घेऊन मुंबई येथे निघाली असल्याचा सांगत मंत्रालयात आदिवासी समाजाचे आमदार खासदार व मुख्यमंत्री यांनी आमच्या मागण्यांवर चर्चा करून तात्काळ निर्णय द्यावा अशी मागणी यात्रेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे .

प्रशासनाचे दुर्लक्ष,पदयात्री जखमी 

दहा दिवस रस्त्याने उन्हातान्हाची परवा न करता तब्बल तीनशे किलोमीटर चालत निघाला असताना शासकीय प्रशासनाने या आंदोलनाकडे ढुंकून ही पाहिले नाही फक्त रस्त्यात पोलिस प्रशासनाने वेळोवेळी मदत केली अशी खंत शाना भाऊ सोनवणे यांनी बोलून दाखवली.तर या पदयात्रे मध्ये चालून चालून अनेकांच्या पायांना जखमा झाल्या आहेत.त्यामध्ये शनिवारी रात्री काही महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पडघा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.