शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये सेनेत बेबनाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:23 IST

शहर, महानगरप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप; डावलले जात असल्याचा आरोप

- प्रशांत मानेकल्याण : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक बांधणी सुरू असताना दुसरीकडे मात्र कल्याणमध्ये शिवसेनेतील अंतर्गत बेबनाव उघडकीस आला आहे. निर्णयप्रक्रिया आणि बैठकांमध्ये डावलले जात असल्याप्रकरणी काही पदाधिकारी नाराज आहेत. शहरप्रमुख विश्वनाथ भोईर आणि कल्याण महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. काहींनी तर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याने सेनेतील हा बेबनाव चर्चेचा विषय ठरला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर शिवसेनेतर्फे शाखाप्रमुख आणि अन्य पदाधिकारी नेमण्यासंदर्भात बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये आम्हाला डावलले जात असल्याचा आरोप कल्याण पूर्व-पश्चिम विधानसभा संघटक अरविंद मोरे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी भोईर आणि साळवी यांना लक्ष्य केले आहे. मनमानीपणे या दोघांचा कारभार सुरू असल्याकडेही मोरे यांनी लक्ष वेधले आहे. माझ्यासह पक्षाचे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र संघटक रवींद्र कपोते आणि कल्याण पश्चिम विधानसभा सहसंघटक दीपक सोनाळकर हे सुद्धा भोईर आणि साळवी यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असल्याचे मोरे यांचे म्हणणे आहे.आमची पाच पदाधिकाऱ्यांची प्रमुख कमिटी आहे. सेना भवनात बैठक असेल तर आम्हाला बोलावले जाते, परंतु स्थानिक पातळीवर अन्य पदाधिकाºयांच्या नेमणुका करताना तसेच बैठकांमध्ये मात्र डावलले जात असल्याचे आणि विश्वासात घेतले जात नसल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. भोईर यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आपले धोरण चुकीचे आहे. सर्वांना विश्वासात घेऊन काम करा. आमची गरज राहिली नसेल तर आम्ही उद्धवजींकडे राजीनामा देण्यास तयार असल्याचे त्यांना सांगितल्याचेही मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, कपोते आणि सोनाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही नाराज असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.‘त्यांचा’ गैरसमज झाला आहे-भोईर, साळवीसध्या कोणत्याही बैठका सुरू नाहीत आणि कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. उद्धवजींच्या आदेशानुसार मुंबईच्या धर्तीवर गटप्रमुखांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. शाखाप्रमुख आणि नगरसेवक स्तरावर हे काम चालू आहे.त्यामुळे या कामासाठी अन्य पदाधिकाºयांना डावलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नाराजी नसल्याचे दावा करत त्या पदाधिकाºयांचा गैरसमज झाला असावा, अशी प्रतिक्रिया शहरप्रमुख विश्वनाथ भोईर आणि महानगरप्रमुख विजय साळवी यांनी दिली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkalyanकल्याण