शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडेंनी महिलांची माफी मागावी म्हणून ठाण्यातील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By सुरेश लोखंडे | Updated: November 4, 2022 22:04 IST

येथील शासकीय विश्रामगृहासमोर या महिला पत्रकारांनी एकत्र येत भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला.

ठाणे: टिकली लावण्याचे बेताल वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केवळ महिला पत्रकारांचीच नव्हे तर समस्त महिलांची माफी मागावी अशी मागणी येथील महिला पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात आज केली आहे.

येथील शासकीय विश्रामगृहासमोर या महिला पत्रकारांनी एकत्र येत भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला. टिकली वरून सध्या सर्व स्तरातून मतमतांतरे व्यक्त होत असताना राज्यात सर्वप्रथम ठाण्यातील महिला पत्रकारांनी आपली भूमिका स्पष्ट करीत संताप व्यक्त केला आणि भिडे यांनी महिलांची माफी मागण्याची मागणी आज जिल्हाधिकारी यांचे लावून धरली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे.

मंत्रालयातील २ नोव्हेंबरच्या घटनेविरोधात पत्रकारांनी एकत्र येत तीव्र शब्दात भिडे यांचा निषेध केला. महिला पत्रकार भिडे यांना प्रश्न विचारत असताना 'तू आधी कुंकू लावून किंवा टिकली लावून ये,  मग तुझ्याशी बोलेन. स्त्री ही भारत माता आहे आणि भारत माता विधवा नाही असे गंभीर वक्तव्य केल्याचे पडसात राज्यात उमटत आहे. त्यास अनुसरून ठाण्यातील महिलांनी भिडे यांच्या या  बेताल वक्तव्याचा खरपूस समाचार घेत तीव्र शब्दात निषेध केला आणि माफी मागण्याची मागणी आज लावून धरली.

टिकली लावावी की नाही हे प्रत्येक महिलेचे वैयक्तिक मत आहे. कपाळावरील टिकली टीकण्यापेक्षा महिलेची अस्मिता टिकणे गरजेचे आहे. सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.  त्यामुळे त्यांचे कर्तुत्व बघितलं गेलं पाहिजे,असे मत यावेळी काही महिला पत्रकारांनी व्यक्त करुन भिडे यांचा निषेध केला. यावेळी पत्रकार हेमलता वाडकर, प्रज्ञा म्हात्रे, जयश्री शेट्टी, रोहिणी दिवाण, अनुपमा गुंडे, सुचिता बिराजदार, सारिका साळुंखे, नम्रता सूर्यवंशी, संपदा शिंदे, अनघा सुर्वे, स्नेहा जाधव आदींनी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

टॅग्स :thaneठाणेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी