शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खारे पाणी झाले नाही गोड; ठाणे खाडीतील पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:21 IST

या प्रकल्पासाठी लागणारा संपूर्ण भांडवली व महसुली खर्च संबंधित ठेकेदाराने करायचा होता, तसेच हे पिण्यायोग्य असलेले पाणी ठेकेदार नमूद केलेल्या दरानुसार महापालिकेस उपलब्ध करेल.

ठाणे : भविष्यात निर्माण होणारी पाणीसमस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने विरोधकांचा विरोध डावलून अडीच वर्षांपूर्वी खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून त्यापासून पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. हा संपूर्ण प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारला जाणार आहे. यासाठी ठेकेदाराला जागा देऊन वीजबिल पालिका भरणार आहे. याशिवाय प्रतिहजार लीटरमागे ६३ रुपये खर्च करून पालिका ते महागडे पाणी विकत घेणार आहे. कळव्यातील पारसिक येथे २० एमएलडीच्या प्रकल्पाचे कार्यादेश देऊन दीड वर्ष उलटले तरी प्रकल्प सुरू झाला नाही. त्याचबरोबर घोडबंदर भागात २०० एमएलडीचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मागील एक वर्षापासून शासनाच्या लालफितीत अडकला आहे.

सध्या ठाणे शहराला विविध स्रोतांपासून दररोज ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. कपातीमुळे दररोज ३१४ दशलक्ष लीटर पाणी ठाणेकरांना मिळत आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीकपातीवर पालिकेने विविध उपाय केले. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व वॉटर रिसायकलिंग हे प्रकल्प हाती घेतले आहेत; परंतु पालिकेला स्वत:ची पाणीपुरवठा योजना अद्याप राबवता आलेली नाही, त्यामुळे पालिकेने खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून त्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला. पीपीपी तत्त्वावर खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार असून, यासाठी मे. अ‍ॅक्वालँग इंडिया प्रा. लि. कंपनीला (पुणे) यांना हे काम देण्याचे निश्चित करण्यात आले. खाडीकिनारी तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य ठिकाणी २० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचा प्रक्रिया (विक्षारण) प्रकल्प उभारून पिण्यायोग्य पाणी तयार करण्यात येणार होते. या कामासाठी पालिकेने सल्लागार नेमण्यासाठी १५ लाखांचा खर्च केला आहे.देखभालीचा २५ वर्षे खर्च ठेकेदार करणारया प्रकल्पासाठी लागणारा संपूर्ण भांडवली व महसुली खर्च संबंधित ठेकेदाराने करायचा होता, तसेच हे पिण्यायोग्य असलेले पाणी ठेकेदार नमूद केलेल्या दरानुसार महापालिकेस उपलब्ध करेल. हे पाणी बाटलीत उपलब्ध होणार होते, तसेच हे विकून ठेकेदारास फायदा होणार होता. या प्रकल्पाच्या उभारणीपासून पुढील २५ वर्षे देखभालीचा खर्च ठेकेदार करणार होता, त्यानंतर हा प्रकल्प हस्तांतरित होईल. एक हजार लीटर पाण्यासाठी ६३ रु पये मोजावे लागतील. चौथ्या वर्षापासून होलसेल प्राइस इंडेक्स (४५ टक्के) आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (५५ टक्के) या प्रमाणात दर ठरेल.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका