शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या जमीन खरेदी-विक्रीची कोकण विभागीय आयुक्तांमार्फत चाैकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 06:07 IST

महाविकास आघाडी सरकारचा निर्णय : दहा वर्षांच्या व्यवहाराची पडताळणी. कोकण विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय समिती ही चौकशी करणार असून, आपला अहवाल दोन महिन्यांत शासनास सादर करणार आहे.

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईतील आरे कॉलनी, ठाण्यातील येऊर असो वा रायगडचा माथेरानचा निसर्गरम्य परिसर, नाशिकच्या इगतपुरी, भंडारदरा किंवा अमरावतीच्या चिखलदऱ्यात आपल्या मौजमजेसाठी अनेक धनिकांनी आदिवासींच्या जमिनींची खरेदी करून त्यावर आलिशान फार्म हाऊस, बंगले बांधले आहेत. हे करताना अनेक व्यवहारात आदिवासी, जमीन महसूल कायदे धाब्यावर बसवून आदिवासींची केलेल्या फसवणुकीच्या तक्रारींसह गेल्या दहा वर्षांत अशा प्रकारे झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

कोकण विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय समिती ही चौकशी करणार असून, आपला अहवाल दोन महिन्यांत शासनास सादर करणार आहे.राज्यातील १३ जिल्ह्यात ५० हजार ५५७ चौरस किलाेमीटर क्षेत्रांत आदिवासीचे वास्तव्य असून, यात वन जमिनीसह मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतजमीन आहे. निसर्गाच्या कुशीत या शेतजमिनी असल्याने अनेकांनी त्या साध्या करारनाम्यावर खरेदी करून त्यावर आपले फार्म हाऊस, बंगले बांधले आहेत. मुंबईतील आरे कॉलनी, ठाण्यातील येऊर, रायगडमधील माथेरान किंवा समुद्रकाठचा निसर्गरम्य परिसर किंवा चिखलदरा, भंडारदरा, इगतपुरी यासारख्या थंड हवेच्या ठिकाणांचा यात समावेश आहे. या ठिकाणी उद्योजक, बिल्डर, सिनेकलाकार, राज्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनी खरेदी केल्या आहेत.

मुंबई नजीकच्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या चार लाख ५३ हजार ७६६ असून, त्यात आदिवासींची लोकसंख्या एक लाख ७९ हजार ५६२ इतकी आहे, तर पालघर जिल्ह्यातील लोकसंख्या १३ लाख २४ हजार ५७ असून, त्यात नऊ लाख ७९ हजार ५६३ इतकी आहे. यातील अनेक आदिवासींना भूमिहीन करून त्यांच्या शेतजमिनी अकृषिक वापरासाठी कायदे धाब्यावर बसवून खरेदी केल्या आहेत. अशाच एका व्यवहाराबाबत वरोराचे आमदार सुरेश धानोरकर यांनी २०१७ च्या अधिवेशनात प्रश्न केला असता तत्कालीन अध्यक्षांनी अशा प्रकारच्या राज्यातील सर्व व्यवहारांची खोलात चौकशीचे निर्देश दिले हाेते. आता तीन वर्षांनंतर का होईना महाविकास आघाडी सरकारने अशा प्रकारे गेल्या दहा वर्षांत आदिवासी जमीन खरेदी-विक्रीचे किती व्यवहार झाले, कोणाची फसवणूक झाली, याची दोन महिन्यांत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रपतींच्या अधिकारांवर अतिक्रमणराज्यांत गेल्या अनेक वर्षांत आदिवासींच्या जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारांत मोठा गैरव्यवहार झाला आहे. आदिवासींच्या एका कायद्याच्या कलम-३६ व ३६ ब नुसार राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय आदिवासींची जमीन खरेदी करता येत नाही. याबाबत एकनाथ खडसे ते बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंतच्या सर्व महसूलमंत्र्यांकडे मी आमदार, खासदार म्हणून वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, पळवाटा शोधून आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांवर अतिक्रमण करून राज्यात आदिवासी जमीन-खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. आता कोकण आयुक्तांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करून अहवाल सादर केला, तर मोठा गैरव्यवहार उघडकीस येईल, असे राज्याचे माजी आदिवासी विकास राज्यमंत्री आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी ‘लोकमत’ला सांगितले.