शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

पगार सरकारचा; कारभार खाजगी दवाखान्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 6:49 AM

मुरबाड तालुक्याचा पसारा पाहता शासनाने मुरबाड आणि त्यानंतर टोकावडे येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण केले. टोकावडे येथे कर्मचारीवर्ग कमी असला तरी मुरबाड येथे कर्मचाºयांसह वैद्यकीय अधिकारी, पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटरसह जोडीला १०८ अशी व्यवस्था मुरबाड रुग्णालयात करून दिलेली आहे.

मुरबाड : मुरबाड तालुक्याचा पसारा पाहता शासनाने मुरबाड आणि त्यानंतर टोकावडे येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण केले. टोकावडे येथे कर्मचारीवर्ग कमी असला तरी मुरबाड येथे कर्मचाºयांसह वैद्यकीय अधिकारी, पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटरसह जोडीला १०८ अशी व्यवस्था मुरबाड रुग्णालयात करून दिलेली आहे. मात्र, येथील वैद्यकीय अधिकारी हे पगार शासनाचा घेत असले तरी कारभार मात्र खाजगी रुग्णालयाचा करतात, असे वास्तव उघडकीस आल्याने मुरबाड रुग्णालयाची आरोग्य सेवा रामभरोसे झाली आहे. याबाबत, चौकशी करून मनसेने कारवाईची मागणी केली आहे.मंगळवारी सकाळीदेखील मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस येथे प्रसूती होणार नसल्याचे सांगून उल्हासनगरला पाठवले. या महिलेला १०८ या रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. मात्र, दोन किमी अंतरावर गेल्यानंतर या महिलेची या रुग्णवाहिकेत नैसर्गिक प्रसूती झाली. अशा पद्धतीने मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचा कारभार मनमानीपणे सुरू असल्याने याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे मुरबाड शहरप्रमुख नरेश देसले यांनी शासनाकडे केली आहे.मुरबाड तालुक्यात आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजले असून योग्य उपचार मिळत नाहीत, म्हणून सरकारी दवाखाने ओस पडू लागले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयावर येणारा ताण लक्षात घेऊन माजी आ. गोटीराम पवार आणि आ. किसन कथोरे यांनी टोकावडे येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभे केले. त्यामुळे मुरबाडला जाणारे रुग्ण टोकावडे येथे उपचार घेऊ लागले. मात्र, तालुक्यातील तीन चतुर्थांश भाग मुरबाड ग्रामीण रु ग्णालयावर अवलंबून असल्याने शासनाने येथे तज्ज्ञ डॉक्टर्ससह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरीही, या रुग्णालयातील खाटा रिकाम्या दिसू लागल्या. याबाबत, माहिती घेतली असता येथील वैद्यकीय अधिकारी राजन पोरे सेवानिवृत्त झाल्यावर येथील डॉक्टर ए.जी. शिंदे यांना प्रभारी निवासी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले. आणखी दोन डॉक्टर हेमंतकुमार खंबायत आणि संगीता जाधव असे डॉक्टर कार्यरत असताना वैद्यकीय अधिकारी ए.जी. शिंदे हे रुग्णालयात फक्त क्वचितच येतात. ते वाशी येथे खाजगी रुग्णालय चालवत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी डॉ. शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पी पाटील यांनी डॉक्टर फड यांची बेकायदेशीर नियुक्ती करून मुरबाड ग्रामीण रुग्णालयात अनागोंदी माजवली आहे. डॉ. फड यांना अनेक वर्षांपासून या दवाखान्यात ११ महिन्यांच्या करारावर शासनाने नियुक्त केले होते. त्यांचा करार ३१ मार्च २०१७ ला संपला असतानाही ते येथे तळ ठोकून बसले आहेत. याबाबत, माहिती घेतली असता डॉ. शिंदे हे स्वत:चा खाजगी दवाखाना वाशी येथे चालवत आहेत. त्यांनी आणि डॉ. केम्पी पाटील यांनी आपल्या मर्जीनुसार डॉक्टर फड यांना बेकायदेशीररीत्या कामावर ठेवले असून त्यांच्यामार्फत या दोन अधिकाºयांनी मुरबाडच्या गोरगरीब जनतेची लूट सुरू केली आहे. फड हे आलेल्या रुग्णाला खाजगी रुग्णालयाची वाट दाखवतात. प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना येथे आॅपरेशन थिएटर नसल्याचे कारण देऊन खाजगी दवाखाना नाहीतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवले जाते. मात्र, तेथे गेल्यानंतर संबंधित महिलेची नैसर्गिकरीत्या प्रसूती होते.सरकारी रुग्णालय म्हटले की, तपासणीसह औषधोपचार मोफत दिले जातात. मात्र, येथे खाजगी मेडिकलमधून रुग्णाला औषधे आणण्यास भाग पाडले जाते. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शिंदे हे निवासी वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ असून ते येथे राहत नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला खाजगी रुग्णालय किंवा उल्हासनगर येथे जावे लागते. जिल्हा शल्य चिकित्सक केम्पी पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, जिल्ह्याचा कारभार मला पाहावा लागत असल्याने मी कुठेकुठे लक्ष ठेवणार? तर डॉक्टर फड यांचा करार संपला असतानाही ते कार्यरत कसे, असे विचारले असता तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या पगाराची व्यवस्था मी करतो, असेही ते म्हणाले.

टॅग्स :docterडॉक्टरthaneठाणे