शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

"साहेब आता तरी एकत्र या", ठाण्यातही लागले मनसे-शिवसैनिकाचे एकत्रित बॅनर!

By अजित मांडके | Updated: July 4, 2023 15:06 IST

मुंबईत मनसे आणि शिवसैनिकांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली आहे.

ठाणे : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात राजकीय उलथा पालथ सुरु झाल्या आहेत. मुंबईत मनसे आणि शिवसैनिकांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली आहे. त्यात आता ठाण्यातही मनसे आणि शिवसैनिकांनी ठाण्यात साहेब आता तरी एकत्र या अशी साद घालणारे बॅनर लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज, उद्धव एकत्र येण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक आतुर झाल्याचेच दिसत आहे.

एक वर्षापूर्वी शिवसेनेतून फुटून शिंदे यांनी वेगळा गट तयार केला आणि भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता बरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादीतही फुट पडली आणि अजित पवार यांनी वेगळी चुल मांडली व सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, याची चुणक आता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे या सर्वांना रोखायचे असेल तर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद घातली जात आहे. वर्षभरापूर्वी देखील अशीच साद दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घातली होती. त्यानंतर आता पुन्हा तशीच साद आता मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घालू लागले आहेत.

ठाण्यात लागलेल्या याच आशयाच्या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. या बॅनरवर साहेब आता तरी एकत्र या अशी साद घातली गेली आहे.  महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे... बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे... आम्हाला महाराष्ट्रात फक्त ठाकरे सरकार पाहिजे असे देखील या बॅनरवर नमुद करण्यात आले असून साहेब एकत्र या... असे म्हंटले आहे. त्यावर मनसेच्या प्रविण बेलोसे आणि शिवसेनेच्या प्रविण उतेकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. बॅनरच्या मध्यभागी बाळासाहेबांचे छायाचित्र असून त्यांच्या दोन्ही बाजूला राज आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :thaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसे