शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लघुगीत स्पर्धेमध्ये सागर मिठबावकर प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 00:07 IST

Badlapur News : ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ यावर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने घेतलेल्या लघुगीत स्पर्धेत ‘पुढचं पाऊल’फेम तुक्या अर्थात सागर मिठबावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

बदलापूर : ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ यावर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने घेतलेल्या लघुगीत स्पर्धेत ‘पुढचं पाऊल’फेम तुक्या अर्थात सागर मिठबावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. मिठबावकर यांनी अवघ्या तीन मिनिटांच्या लघुगीतातून नागरिकांमध्ये शहर स्वच्छतेबाबत जनजागृतीचा उत्तम प्रयत्न केला आहे.सागर यांनी या गीतातून आपले शहर हा आपला अभिमान असल्याचे सांगून आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पान, गुटखा खाऊन रस्त्यावर कुठेही थुंकू नका, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करा, आपल्या चांगल्या आरोग्यासाठी झटणाऱ्या प्रशासनाला सहकार्य करा, अशा बाबी गीतातून मांडल्या आहेत. गीताची चालही उत्तम जमल्याने सोशल मीडियावरही त्यांच्या गाण्याला चांगली पसंती मिळत आहे. सागर यांनी हे गीत लिहिले असून संदीप कांबळे यांनी ते गायले आहे. मेघनाथ खंडागळे, विजय कांबळे यांनी त्यांना साथ दिली आहे. संदीप डावरे संगीतकार असून, यश मिठबावकर यांनी व्हिडीओ चित्रण केले आहे.कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने तीन विविध गटांत ही स्पर्धा घेतली. त्यातील १७ ते ३५ वयोगटातील लघुगीत स्पर्धेत सागर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. १० ते १६ या वयोगटात प्रणाली भागवत हिने, तर ३६ व त्यापुढील वयोगटात प्रदीप गर्जे व शिवाजी सांगळे यांनी क्रमांक पटकावला आहे.निबंध स्पर्धेत १० ते १६ वयोगटात प्रणाली भागवत हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. १७ ते ३५ वयोगटात नेहा आंबोले यांनी प्रथम तर विशाल मसुरकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे. विशेष कौशल्य असणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नगर परिषदेने ही स्पर्धा घेतली होती. विजेत्यांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.  

लघुपट स्पर्धेत विशाल मसुरकर यांची बाजी लघुपट स्पर्धेत विशाल मसुरकर यांनी प्रथम, राज बांगर यांनी द्वितीय तर रोहित भोईर यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे.  चित्रकला स्पर्धेत १० ते १६ वयोगटात हर्ष कोल्हे याने प्रथम, निकिता जाधव हिने द्वितीय, तर पालवी लिकाहर हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. nया स्पर्धेतील सर्व विजेत्यांवर  अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर