शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१६०० हेक्टर कांदळवनाच्या सुरक्षेचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: February 25, 2017 23:23 IST

त्सुनामीसारख्या संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या कांदळवन संरक्षणाचे न्यायालयीन आदेश आहेत. मात्र मुंब्रा, दिवा, घोडबंदर, मीरा-भार्इंदर आदी खाडी किनाऱ्यांप्रमाणेच

- सुरेश लोखंडे, ठाणेत्सुनामीसारख्या संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या कांदळवन संरक्षणाचे न्यायालयीन आदेश आहेत. मात्र मुंब्रा, दिवा, घोडबंदर, मीरा-भार्इंदर आदी खाडी किनाऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील अन्यही ठिकाणचे कांदळवन वाळूमाफिया आणि बिल्डर लॉबीने नष्ट केले आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्यास विलंब होत आहे. एवढेच नव्हे, तर भिवंडी व ठाणे तालुक्यातील सुमारे १६०० हेक्टर कांदळवन संरक्षित करण्याच्या प्रतीक्षेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.ठाणे खाडी, मुंब्रा रेती बंदर, दिवा खाडीकिनारचे कांदळवन तर पूर्णपणे नष्ट झाले आहे. आंजूर, दिवे येथील कांदळवनावर भराव टाकून ती नष्ट केल्याचा विषय तर डीपीसीच्या बैठकीतही चर्चेला आला आहे. ‘वाळूमाफिया व बिल्डर्स यांनी खाडीकिनारे नष्ट करायला घेतले आहेत,’ असे दस्तुरखुद्द माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीच उघड केले आहे. ती वाचवण्यासाठी कांदळवनांची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र ते हवेत विरले आहे. भिवंडी तालुक्यातील कांदळवनाची व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवनव्याप्त क्षेत्र सुमारे १४७१ हेक्टर आहे. ते संरक्षित करण्यासह त्याची अंतिम अधिसूचना काढणे अपेक्षित आहे. हा सुमारे एक हजार ६१८ हेक्टरवरील कांदळवन संरक्षित (अधिसूचित) करण्याचा प्रस्ताव अद्याप धूळखात आहे. शासकीय जमिनीवरील कांदळवनपट्टे वेळीच वन विभागाकडे हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. मात्र, ते अद्याप फायलीच्या चक्र व्यूहात अडकलेले आहे. कांदळवन नष्ट करणाऱ्या सुमारे ६० जणांवर गुन्हे दाखल केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मीरा-भार्इंदर भागातील कांदळवनाच्या जागेवर भराव टाकण्यात आलेला आहे. कनकिया नगर, तिवारी कॉलेज रोड, शिवनेरी नगर या परिसरात बांधकामे सुरू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिल्यानंतर १२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या कांदळवनाच्या ५० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम झाले नसावे, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाचे आहेत. तरीदेखील भराव टाकण्याची परवानगी कशी दिली, असे विचारून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याण यांनी महापालिकेला धारेवर धरलेले आहे. कांदळवनाच्या जागांवर कचरा टाकण्यास विरोध आहे. तरीदेखील दिवा येथे खाडी किनाऱ्याजवळ डम्पिंग आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखलकांदळवन सुरक्षेची बाब लोकमतने वेळोवळी प्रसिद्ध केली आहे. यास अनुसरून एक जनहित याचिकादेखील मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत प्रशासनावर ताशेरे ओढून २ मार्चच्या सुनावणीला जिल्हाधिकारी, ठाणे मनपा आयुक्त आणि वनाधिकारी यांना हजर होण्यास सांगितले आहे. याआधीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन संरक्षण समिती स्थापन झाली आहे. विभागीय महसूल आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या बैठकीद्वारे वन संरक्षणाचा आढावा घेतला जात आहे. मात्र, या वनांच्या संरक्षणासाठी खास ठोस उपाययोजना होत असल्याचे दिसून येत नाहीनवी मुंबई परिसरातील ऐरोली ते बेलापूर या परिसरात सुमारे १४७५ हेक्टरवर कांदळवन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. ही प्रारूप अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्धदेखील झाली आहे. त्यामध्ये वाशी, तळवळी, सारसोळे, नेरूळ, घणसोली, जू, तुर्भे, कोपरखैरणे, गोठवली, सोनखार (नवी मुंबई) शहाबाज, दिवे, करावे आणि ऐरोली परिसरातील कांदळवनाचा समावेश करण्यात आला आहे.