शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांच्या सभेची चालली पॉवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 01:35 IST

ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते.

ठाणेठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते. परंतु, अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीचा निकाल लागून राजन विचारे हे पुन्हा एकदा निवडून आले आहेत. या निवडणुकीत रंगत वाढवण्यासाठी शिवसेनेकडून केवळ एकमेव उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. तर, राष्टÑवादीने मतदानाच्या शेवटच्या दिवसांच्या सत्रात शरद पवार आणि जयंत पाटील यांची सभा घेतली होती. परंतु, उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी झाली, तर शरद पवार आणि पाटील यांच्या सभांचा मात्र काहीच परिणाम ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांवर झाला नसल्याचे दिसून आले.ठाणे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राष्टÑवादीतर्फे आनंद परांजपे यांना अनपेक्षितपणे या निवडणुकीत उतरवण्यात आले. तर, शिवसेनेने राजन विचारे यांच्यावर विश्वास टाकला. त्यानंतर प्रचार काळात २१ एप्रिल रोजी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा झाली. तिला पोहोचण्यास ठाकरे यांना उशीर झाला होता. तसेच या सभेला म्हणावी तितकी गर्दीसुद्धा झाली नव्हती. त्यामुळे त्याचा कितपत परिणाम होईल, याबाबत मात्र चिंता व्यक्त केली जात होती.परंतु, या सभेत शरद पवार यांनी मोदींवर टीका करतानाच, राज्य सरकारवरही आसूड ओढले होते. शिवाय, पुलवामा हल्ला आणि इतर मुद्यांनासुद्धा त्यांनी हात लावला होता. परंतु, त्यांच्या सभेचा काहीच परिणाम न झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. शिवाय, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे यासुद्धा ठाण्यात तळ ठोकून होत्या. परंतु, त्यांचासुद्धा प्रभाव पडला नसल्याचे निकालात दिसून आले.ठाकरेंची सभाउद्धव ठाकरे यांनी केवळ १० मिनिटांचेच भाषण केले. या भाषणात त्यांनी युतीवर भाष्य करताना, काँग्रेस, राष्टÑवादीवर भरपूर टीका केली होती. तसेच युतीच्या काळात जी काही विकासकामे केली, त्यांची माहिती भाषणातून दिली होती.पवारांची सभाशरद पवार यांची सभा चांगलीच गाजेल आणि त्याचा मतदानावर आणखी चांगला परिणाम होईल, अशी शक्यता वाटत होती. त्यानुसार, प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ठाण्यात सभा झाली.राज ठाकरेंची सभामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घ्यावी याकरिता मनसैनिकांनी प्रयत्न केले. ते असफल ठरले. मात्र प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाण्यात आले व त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पत्रकारांना ते सामोरे गेले नाहीत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालthane-pcठाणे