शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सत्ताधारी भाजपाने सेनेला खिजवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:23 IST

ऐन शिवजयंतीच्या मुहूर्तावर सत्ताधारी भाजपाने शिवसेनेला ‘जोर का झटका धीरे से’ देत विरोधी पक्षनेत्याचे दालन स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात विलीन करून टाकून खिजवण्याचा प्रयत्न केला.

भार्इंदर : ऐन शिवजयंतीच्या मुहूर्तावर सत्ताधारी भाजपाने शिवसेनेला ‘जोर का झटका धीरे से’ देत विरोधी पक्षनेत्याचे दालन स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या दालनात विलीन करून टाकून खिजवण्याचा प्रयत्न केला.शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. तो सत्ताधारी भाजपाने अद्यापही रोखून धरला आहे. या पदावरील नियुक्तीची महापौर डिम्पल मेहता यांच्याकडून अद्याप घोषणा होत नसल्याने सेनेने अनेकदा आंदोलन करून हे पद पदरात पाडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यातच सेनेच्या दाव्याला आणखी झटका देत सत्ताधाºयांनी पालिका मुख्यालयातील दुसºया मजल्यावरील विरोधी पक्षनेत्याचे दालन थेट तळमजल्यावर स्थलांतरित करण्याचा कट रचला. त्यात ते यशस्वी होऊ नये, यासाठी सेनेने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेत आपली आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याला सत्ताधारी व प्रशासनाने कायद्यावर बोट ठेवून ताटकळत ठेवले.विरोधी पक्षनेतेपद सेनेला मिळून नेत्याच्या नावाची घोषणा व्हावी, यासाठी सेनेने निवडणुकीनंतरच्या पहिल्या महासभेपासून जीवाचे रान केले. मात्र, सत्ताधाºयांनी त्याला दाद न देता त्या पदावरील नियुक्तीच्या निर्णयाचा चेंडू महापौरांनी राज्य सरकारकडे टोलवला. सरकारने निर्णयाचा चेंडू पुन्हा महापौरांकडेच टोलवला. त्यावर अद्याप महापौरांचा निर्णय झाला नसताना विरोधी पक्षनेत्याच्या दालन स्थलांतराचा निर्णय सत्ताधाºयांनी गनिमी काव्याने घेतला. त्याची कुणकुण सेनेला लागू न देताच सत्ताधाºयांनी गेल्या आठवड्यात आयुक्त बी.जी. पवार यांची भेट घेत ते दालन स्थायी सभापती दालनात विलीन करण्यासह त्या नेत्याचे दालन तळमजल्यावर स्थलांतरित करण्याबाबत चर्चा केली. त्यावर आयुक्तांनी तो सत्ताधाºयांचा अधिकार असल्याचे स्पष्ट करत दुसºया मजल्यावरील दालन स्थायी सभापतींच्या दालनात विलीन करण्यास सहमती दर्शवल्याचे सांगितले.सत्ताधाºयांनी त्या दालनाला ठोकलेले सील परस्पर काढून ते स्थायी सभापतीच्या दालनात विलीन करत त्याच्या नूतनीकरणाला सोमवारपासून सुरुवात केली. सेनेने या दालनाचा परस्पर ताबा घेत या पदावरील दावेदार राजू भोईर यांना अनौपचारिकपणे विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान केले. प्रशासनाला त्याची कुणकुण लागताच त्याच दिवशी या दालनाला सील ठोकले होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा