शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अस्वच्छ खाद्यपदार्थांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 04:48 IST

उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये अवघ्या १५ दिवसात वडापावमध्ये पाल आढळल्याच्या दोन घटना घडल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छतेचा विचार केल्यास शहरातील अनेक वडापाव सेंटर आणि खाद्यपदार्थ विकणारी दुकाने नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य नागररिकांच्या आवाक्यातील वस्तू हातगाडीवरच मिळत असली, तरी तेथील किमान स्वच्छतेकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज या दोन्ही घटनांनी अधोरेखित केली आहे.अंबरनाथमधील बबन वडापाव सेंटरमधील वड्यात पाल आढळल्यानंतर, काही दिवसांतच बदलापूरातील खिडकी वडापाव सेंटरमध्ये वड्यात पाल आढळली. या दोन्ही घटनांनी उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा आणि त्या ठिकाणच्या स्वच्छतेचा प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे. हातगाडीवर वडा पाव विकणे ही विक्रेत्यांची गरज आहे. यातून ग्राहकांचीही सोय होत असल्याने पालिकेचा अतिक्रमण विभाग या हातगाड्यांकडे बघून न बघितल्यासारखे करतो. हातगाड्यांवर जे खाद्यपदार्थ विकले जातात, त्या ठिकाणच्या स्वच्छतेची पाहणी केली असता, हे खाद्यपदार्थ नारिकांच्या आरोग्याला बाधण्याची शक्यता असल्याचे दिसते. बदलापूरातील स्टेशन परिसरात अनेकजण हातगाडीवर खाद्यपदार्थ विकतात. रस्त्यावरील धुळ असो वा आजुबाजुची अस्वच्छता, त्याचा काहीही परिणाम या हातगाडीचालकांवर होत नाहीत. नागरिकदेखील आरोग्याची पर्वा न करता या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. हातगाडीवरील खाद्यपदार्थ हे कमी पैशात भूक भागविण्याचे माध्यम झाले आहे. अनेकजण झटपट काहीतरी खाण्याच्या नादात या खाद्यपदार्थांवर तुटून पडतात. त्यामुळे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थ विकणाºयांची संख्या वाढत आहे.अंबरनाथ असो वा बदलापूर या दोन्ही ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री सर्रासपणे केली जाते. आजुबाजुचा परिसर नेहमीच अस्वच्छ असतानाही, त्याचठिकाणी खाद्यपदार्थ विकेल जातात. एवढेच नव्हे तर उतलेले खाद्यपदार्थ त्याचठिकाणी फेकून देण्याचे प्रकारही वाढले आहेत. अंबरनाथ स्टेशन परिसरात सायंकाळी ७ नंतर चायनिज खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात येतात. या खाद्यपदार्थांतूनही धोका होण्याची शक्यता आहे. येथेही स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. ज्याठिकाणी हे खाद्यपदार्थ बनविले जातात त्याच ठिकाणी गटार असून तेथील माशांमुळे आरोग्यास अपाय होण्याचा धोका आहे. रात्रीच्यावेळी लावण्यात येणाºया एलईडी दिव्यांवर उडणारी पाखरे खाद्यपदार्थात बरेचदा पडतात. त्यादृष्टीनेही येथे कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी झुरळांचा त्रास आहे. शहरात अनेक ठिकाणी स्नॅक्स कॉर्नरच्या नावावर दिवसागणीक हातगाड्यांची संख्या वाढत आहे. सध्या वड्यात पाल आढळल्याची चर्चा असली तरी भविष्यात यापेक्षाही घातक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नियमांची सर्रास पायमल्लीखाद्यपदार्थ विक्रीसाठी अन्न व औषध प्रसासनाचा रितसर परवाना काढणे गरजेचे आहे. ते काढणे सोपे झाले आहे. मात्र कायदा धाब्यावर बसवून अनेक हातगाडीचालक बेधडकपणे खाद्यपदार्थांची विक्री करीत आहेत.शहरात अनेक हातगाड्यांनी नियम मोडलेले असले, तरी त्यांनी स्वच्छतेची चोख व्यवस्था केलेली आहे. मात्र काही दुकानदारांनी हे नियम धाब्यावर बसवून अस्वच्छ ठिकाणी आपला व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे पालिकेने या दुकानांवर कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :foodअन्नfood poisoningअन्नातून विषबाधाHealthआरोग्यbadlapurबदलापूर