शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ई-स्कूटरचा बेकायदा वेग वाढवणाऱ्यांवर आरटीओची कारवाई; ५० दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 20:18 IST

प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल-डिझेल बचतीसाठी इलेक्ट्रिकल वाहने वापरणाऱ्यांनी ताशी २५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिकल स्कूटरच्या बॅटरीमध्ये फेरफार करून तिचा वेग वाढविल्यामुळे स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

ठाणे :

प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पेट्रोल-डिझेल बचतीसाठी इलेक्ट्रिकल वाहने वापरणाऱ्यांनी ताशी २५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिकल स्कूटरच्या बॅटरीमध्ये फेरफार करून तिचा वेग वाढविल्यामुळे स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) बॅटरीमध्ये फेरफार झालेल्या स्कूटरवर कारवाईची मोहीम सुरू केली असून अशा ५० स्कूटरवर आतापर्यंत कारवाई केल्याची माहिती ठाणे आरटीओने शनिवारी दिली.

राज्य शासनाने पर्यावरण संवर्धनाकरिता इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण अवलंबले आहे. अशा दुचाकींना मोटार वाहनकरातून सूट दिलेली आहे. ताशी २५ किमीपेक्षा कमी वेगाच्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीची आवश्यकता नाही. ते चालविण्यासाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) ची आवश्यकता नाही. त्यामुळे २५० वॅट बॅटरीच्या स्कूटरच्या खरेदीचा वेग वाढला आहे. या वाहनांचा वेग मर्यादित असल्यामुळे अनेकजण दुचाकींमध्ये बेकायदेशीर बदल करून वेग वाढविण्याचा प्रयत्न करतात. बॅटरीची क्षमता वाढविल्याने वाहनांचा वेग वाढत असला, तरी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशाच काही दुचाकींना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर बेकायदेशीरपणे धावणाऱ्या अशा दुचाकींवर कारवाईचे आदेश परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले.

इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री करण्यापूर्वी केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार आरटीओ मान्यताप्राप्त संस्थेचे (व्हेइकल मॉडेल) प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र असलेल्या वाहनांनाच नोंदणीमध्ये आरटीओकडून सवलत मिळते. मात्र, असे प्रमाणपत्र न घेता, परस्पर दुचाकीत बदल करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. ठाण्यात १९ ते २७ मे दरम्यान अनधिकृत इलेक्ट्रिक दुचाकीवर कारवाईची धडक मोहीम आरटीओने सुरू केली आहे. आतापर्यंत ५० दुचाकी ठाणे आरटीओने जप्त केल्या. त्यांच्या मालकांवर फौजदारी गुन्हा आणि दंडात्मक कारवाई होणार आहे. ठाण्यात गेल्या वर्षभरामध्ये एक हजार २९६ दुचाकींची नोंद झाली आहे. ज्या वाहनांना नोंदणीतून सूट आहे, तरीही त्यांनी अंतर्गत बदल केले आहेत. अशा वाहनांवर ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.""आरटीओकडे नोंदणी न करण्यासाठी एकीकडे सवलत मिळवायची आणि दुसरीकडे वेग वाढविण्यासाठी बॅटरी किंवा अन्य मार्गाने अंतर्गत बदल करायचे. अशा इलेक्ट्रिकल दुचाकींवर कारवाई केली जात आहे. मीरा-भाईंदर, भिवंडी आणि ठाण्यातील दुचाकींवर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे कोणीही वाहनांमध्ये अंतर्गत बदल करू नये. तसे बदल करणारे पुरवठादार आणि उत्पादक यांचाही शोध घेण्यात येत आहे.""- जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

टॅग्स :thaneठाणे