शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर बलात्कार करून ५.५० लाखांच्या खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 21:58 IST

आरटीआय कार्यकर्ता असल्याची बतावणी करून कळव्यातील एका विवाहितेवर पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार करण्यात आला.

ठाणे : आरटीआय कार्यकर्ता असल्याची बतावणी करून कळव्यातील एका विवाहितेवर पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार करण्यात आला. कहर म्हणजे यातील आरोपीच्या पत्नीनेच पीडित महिलेचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा पीडित महिलेकडेच साडेपाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. प्रकरण हाताबाहेर गेल्यामुळे अखेर याप्रकरणी पीडित महिलेने कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.केवळ आरटीआय कार्यकर्ता असल्याचा जोरावर विशाल मोरे (नावात बदल) हा या पीडित महिलेला २०१५ पासून ते २० जुलै २०१७ या कालावधीत वेगवेगळी माहिती मागवण्याच्या नावाखाली मानसिक छळ करीत होता. मोबाइलवर फोन करून तो तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. तिने त्याला विरोध केल्यानंतर त्याने पती आणि मुलाला ठार मारण्याची तसेच नोकरीही घालून टाकण्याची धमकी दिली. नंतर तिला जांभळीनाका येथील एका लॉजवर बोलावून तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन त्या प्रकाराचे अश्लील फोटो काढले. ते विशालची पत्नी शोभना (नावात बदल) हिने पीडित महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवून तिच्याकडेच साडेपाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम दिली नाही, तर पतीसह तुझ्या नातेवाइकांना हे फोटो पाठवण्यात येतील, अशीही धमकी तिला दिली.या सर्वच प्रकाराचा कळस झाल्यानंतर सुरुवातीला बदनामी नको, म्हणून गप्प राहिलेल्या या महिलेने धाडस करून अखेर या प्रकरणी शहापूरच्या या कथित आरटीआय कार्यकर्त्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात ५ आॅक्टोबर रोजी दाखल केला आहे. यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी दिली.

 

टॅग्स :MolestationविनयभंगRapeबलात्कार