शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत ५३१ कोटींचा घोटाळा?, लाचलुचपत खात्याकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:38 IST

कर बुडवून ५३५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उघड केली.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वास्तुविशारद, कर आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी बिल्डरांशी संगनमत करत कर बुडवून ५३५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उघड केली. या संदर्भात त्यांना एक हजार ८५३ जणांची यादी मिळाली असून त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. ही माहिती आणि तक्रारीचे प्रतिज्ञापत्रही त्यांनी सादर केले असून गैरव्यवहार उघड केल्याने जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.महापालिका हद्दीत १९९० पासून ओपन लॅण्ड टॅक्स प्रकरणात हा घोटाळा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडून माहितीच्या अधिकारात तपशील मागवला होता.महापालिकेने अनेक बिल्डरांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला. मात्र, त्यांच्याकडून कर वसूल केलेला नाही. काही बिल्डरांनी तर बांधकाम पूर्णत्वाचा दाखल न घेताच घरे ताब्यात दिली आहेत. त्या घरांचेही उत्पन्न बुडाले. बाल्कनीचा दंड, स्टेअरकेअस प्रिमियम, सामासिक अंतर न सोडता केलेल्या बांधकामाला रेडीरेकनरनुसार दंड आकारणे आवश्यक होते. तेही न केल्याने पालिकेचे १०० ते १२५ कोटींचे नुकसान झाले.वास्तुविशारद, नगररचना आणि कर विभागाच्या अधिकाºयांच्या बिल्डरांशी असलेल्या संगनमतामुळे एकंदर ५३१ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. वास्तुविशारद आणि बिल्डरांनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही. त्यासाठी अधिकाºयांशी हातमिळवणी केली. त्यातून ओपन लॅण्डवरील ३९५ कोटींचा करही थकलेला आहे. ज्यांचा हा कर थकला आहे, त्यांच्याकडून तो वसूल न करता बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला गेल्याने अशा इमारतींना दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे दुहेरी कर आकारणी झाल्याचा आक्षेप घेत अनेकांनी तो भरण्यास नकार दिला.या गैरव्यवहाराच्या माहितीची पार्श्वभूमी सांगताना म्हात्रे म्हणाले, सध्या पालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. बिल्डरांचा ओपन लॅण्ड टॅक्स कमी करूनही नागरिकांना करात सवलत दिलेली नाही. ती करआकारणी अधिक असल्याची टीका होऊनही महासभेने त्यावर निर्णय घेतलेला नाही.बिल्डरांना सवलत देताना सामान्यांचा विचार होणे आवश्यक होते. त्याविषयी महासभेत आवाज उठविला. तसेच प्रशासनाकडे दाद मागितली. पण प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. त्यातून ५३१ कोटींचा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याची सखोल चौकशी केल्यास त्यातून आणखी काही घबाड हाती लागण्याची शक्यता नाकारतायेत नाही. प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. कारण ते बिल्डरधार्जीणे आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीCrimeगुन्हा