शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांकडून कोविड रुग्णांची ५० लाखांची लूट; 'ही' आहेत लूटमार करणारे हॉस्पिटल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 08:29 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने दिला दणका : २४ लाख ७९ हजार रुपये केले वसूल

कल्याण : खाजगी कोविड रुग्णालये रुग्णांकडून उपचारापोटी जास्तीचे बिल आकारत आहे. याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेने जास्तीच्या बिलांवर बोट ठेवून संबंधित रुग्णांलयांकडून खुलासा मागविला आहे. यानंतर ४९.९३ लाखांपैकी तब्बल २४ लाख ७९ हजार रुपये रुग्णांना त्यांनी परत केले आहेत. या कारवाईमुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.

मनपाचे लेखा अधिकारी सत्यवान उबाळे यांनी ही माहिती दिली आहे. कोविड रुग्णालयातील रुग्णांकडून सरकारी दराप्रमाणे बिल आकारणे बंधनकारक आहेत. मात्र, खाजगी रुग्णालये मनमानीपणे बिल आकारत आहेत. ते भरले नाही तर रुग्णाला डिस्चार्ज दिला जात नाही. या संदर्भात मनपा प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन मनपाने बिल तपासणी मोहीम सुरू केली आहे. मनपा हद्दीतील १६ रुग्णालयांनी रुग्णावर उपचार केल्याच्या बदल्यात विविध रुग्णालयांकडून एक कोटी २८ लाख ७५ हजारांचे बिल आकारले होते. या एकूण बिलांच्या रक्कमेपैकी ४९ लाख ९३ हजार ६७९ रुपये जास्तीचे आकारल्याने त्यावर मनपाने आक्षेप नोंदविला होता. त्यापैकी २४ लाख ७९ हजार रुपये रुग्णांना परत केले आहेत. उर्वरित २५ लाख १२ हजारांची रक्कम संबंधितांकडून वसूल होणे बाकी आहे. त्यासंदर्भात रुग्णालयाकडे मनपाने खुलासा मागविला आहे. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा मिळाला नाही तर ही रक्कम वसूल केली जाणार आहे.‘ही’ आहेत रुग्णांची लूटमार करणारी रुग्णालयेरुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांत ऑप्टीलाइफ, साई हॉस्पिटल, ए अ‍ॅण्ड जी, नाहर, मेडीहोम, सिद्धिविनायक, श्वास, स्वामी समर्थ, साई आरोग्यम्, नोबेल, श्रीदेवी आणि आयकॉन यांचा समावेश आहे. यापैकी जास्तीच्या बिलाबाबत सगळ्यात जास्त आक्षेप ए अ‍ॅण्ड जी रुग्णालयाचे आहेत. त्यापैकी बहुतांश आक्षेप त्यांनी मान्य करून रुग्णांना त्यांची रक्कम परत केली आहे. काही रुग्णांना त्यांचे पैसे हे धनादेशाद्वारे, रोख स्वरूपात परत केले आहेत. तर काहींनी त्यांच्या जास्तीच्या बिलाची रक्कम बिलात वळती करून बिल कमी करुन घेतले आहे. कल्याण महापालिकेच्या अपेक्षांना दाद न देणाºया दोन रुग्णालयांचा कोविड परवाना रद्द करण्याची कारवाईदेखील यापूर्वी महापालिकेने केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या