शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींची खंडणी वसूली: ठाणे न्यायालयाने फेटाळला संजय पुनामियाचा अटकपूर्व जामीन

By जितेंद्र कालेकर | Updated: August 20, 2021 21:54 IST

मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी करोडोंची खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या संजय पुनामिया याचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी शुक्रवारी फेटाळला.

ठळक मुद्दे सुनिल देसाईनेही घेतला अर्ज मागेपरमबीर सिंग खंडणी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी करोडोंची खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या संजय पुनामिया याचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी शुक्रवारी फेटाळला. यातील २८ पैकी निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, विकास दाभाडे यांनी यापूर्वीच अटकपूर्व अर्ज मागे घेतला असून शुक्रवारी सुनिल देसाई या निलंबित पोलीस कॉन्स्टेबलनेही अटकपूर्व जामीनअर्ज मागे घेतला.मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखलकरु न त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी सिंग यांच्या सांगण्यावरून प्रदीप शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी केला आहे. तन्रा यांच्याकडून एक कोटी २१ लाख रुपये, क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याकडून तीन कोटी ४५ लाख तसेच रियाज भाटी याच्याकडून एक कोटी ५० लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अलिकडेच परमबीर सिंग यांच्यासह निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम तसेच खासगी व्यक्ती संजय पुनामिया, विकास दाभाडे, कुख्यात गुंड रवी पुजारी, विमल अग्रवाल, बरखा अग्रवाल, किशोर अग्रवाल, रितेश शाह आणि मुजावर आदी २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संजय पुनामिया याने रियाझ भाटी यांच्याकडून तब्बल दीड कोटींची खंडणी माजी पोलीस आयुक्त सिंग यांच्यासाठी घेतल्याचा दावा ठाणे न्यायालयात फिर्यादीचे वकील अ‍ॅड. सागर कदम यांनी केला. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना अटकपूर्व जामीन दिला जाऊ नये, असा युक्तीवाद त्यांनी केला. ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी हे मान्य करीत पुनामिया यांचा हा अर्ज शुक्रवारी फेटाळला. तर देसाई यांच्या वकीलानेही त्याचाही अटकपूर्व जामीनाचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे या आरोपींना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.* शर्मा तळोजा करागृहात-अंटालिया स्फोटक प्रकरणात संशयित आरोपी असलेले शर्मा हे एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना तळोजा कारागृहात ठेवले आहे. याच कारागृहातून त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाणेनगरच्या खंडणीतील गुन्हयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज त्यांनी अलिकडेच घेतला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी