शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
4
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
5
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
6
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
7
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
8
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
9
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
10
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
11
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
12
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
13
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
14
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
15
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
16
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
17
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
18
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
19
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
20
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

उल्हासनगरात स्थायी समिती सदस्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:40 PM

१७ फेब्रुवारीला निवडणूक : ‘साई’च्या तीन नगरसेवकांचे पद रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : साई पक्षाच्या १० नगरसेवकांचे भाजपमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर तीन नगरसेवकांचे स्थायी समितीतील सदस्यपद आयुक्तांनी रद्द केले. आगामी महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार असून त्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.उल्हासनगर महापालिकेत १२ नगरसेवक असलेल्या साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी ऐन महापौर निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये विलिनीकरणाचा निर्णय घेतला. इदनानी यांच्या निर्णयाला १२ पैकी २ नगरसेवकांनी हरकत घेतल्याने १० नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यामुळे महापालिकेत भाजपचे संख्याबळ ३१ वरून ४१ झाले. मात्र महापालिकेत स्पष्ट बहुमत असतांना बंडखोर १० ओमी समर्थक नगरसेवकांमुळे भाजप ऐवजी शिवसेनेचा महापौर निवडून आला. माजी महापौर व ओमी टीमच्या नगरसेविका पंचम कलानी यांनी साई पक्षाच्या विलिनीकरणानंतर स्थायी समितीत साई पक्षाचे तीन सदस्य कसे? असे पत्र आयुक्तांना दिले. त्यांचे समिती सदस्यपद रद्द करण्याची मागणी केली होती.महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नगरसेविका पंचम कलानी यांच्या पत्रावरून स्थायी समितीतील साई पक्षाच्या सदस्या ज्योती भटिजा, दीप्ती दुधानी व दीपक सिरवानी यांचे पद रद्द ठरविले. रिक्त झालेल्या तीन स्थायी समिती सदस्यांची निवडणूक १७ फेबु्रवारीच्या महासभेत होणार असून सदस्य पदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली. ज्योती भटिजा, दीप्ती नावानी, दीपक सिरवानी यांचे समिती सदस्यपद आयुक्तांनी रद्द केल्याने पुन्हा त्यांच्याच निवडीला भाजपने हिरवा कंदील दिला. मात्र इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे पक्ष वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ३ पैकी २ भाजप सदस्य निवडून जाऊ शकतात. तर एका जागेसाठी भाजप व साई पक्षाचे गुण समसमान होत असल्याने, त्याबाबतचा निर्णय महासभेत घेण्यात येणार आहे. साई पक्षात गजानन शेळके व सविता तोरणे हे दोन नगरसेवक आहेत.स्थायी समितीतभाजपचे बहुमतस्थायी समितीमध्ये भाजप व साई पक्षाचे १६ पैकी ९ सदस्य होते. स्थायी समितीमध्ये बहुमत मिळणार अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. शिवसेना-५ व रिपाइं व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ असे एकूण ७ सदस्य आहेत.