शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर मधील रस्त्यांची झाली चाळण ; गणपती बाप्पाचे आगमन खड्डयांमधूनच   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 20:10 IST

या वर्षी देखील पावसाळा सुरु होताच शहरातील बहुतांश लहान - मोठे रस्ते खड्ड्यात गेले आहेत .  त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असुन वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत .

मीरारोड -  मीरा भाईंदर मधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून गणरायाचे आगमन देखील भाविकांना खड्डेमय रस्त्यांवरून करावे लागले . शहरातील मुख्य रस्त्यां पासून गल्लीबोळातील रस्ते देखील खड्ड्यात गेले असून गेल्या वर्षी खड्डयां मुळे बळी जाऊन देखील महापालिका आणि नगरसेवक यांचे दुर्लक्ष कायम आहे . 

या वर्षी देखील पावसाळा सुरु होताच शहरातील बहुतांश लहान - मोठे रस्ते खड्ड्यात गेले आहेत .  त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असुन वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत . दुचाकी स्वरांना तर खड्डे चुकवत वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे . पालिकेने काही ठिकाणी खड्ड्यात भरलेली खडी सुद्धा निघाली असून ती रस्त्यावर पसरल्याने आजूबाजूने जाणाऱ्या पादचाऱ्यांना वाहनाच्या चाकाखाली दगड उडून मार बसण्याची भीती वाटते . 

खड्डयांमुळे काही चालक व प्रवाश्याना पाठ , कंबर दुखीचा त्रास  देखील होत असल्याच्या तक्रारी आहेत . मुळात पालिका रस्ता बनवताना तो निकृष्ट बनवते आणि त्याचा समतोस साधला जात नाही म्हणून रस्त्यात पाणी साचुन दरवर्षी रस्ते खराब होतात . मग त्याच रस्त्यांच्या पॅचवर्क साठी कोट्यवधी रुपयांचे ठेके दिले जातात . 

गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये  काशिगावा जवळ छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील एका खड्डय़ा मुळे बोरीवलीच्या दत्तापाडा मार्गावर राहणारे हेमंत कांबळे (33) यांचा मृत्यु झाला होता. खड्डय़ा मुळे एकटीव्हा वरुन खाली पडलेल्या कांबळे यांच्या अंगावर मागुन आलेला गॅस सिंलेंडरचा ट्रक चढला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेने महापालिकेवर संतापाची झोड उठली होती .  यंदा देखील खड्डयां मुळे आणखी कोणाचा बळी जाण्याची वाट पालिका पहात आहे का ? असा संताप लोकं व्यक्त करत आहेत . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे